• Sat. Sep 21st, 2024

मंगळवारी ‘सामना’तून नियुक्त्या, अन बुधवारी ठाकरे गटाला हादरा, शिलेदार शिंदेंच्या शिवसेनेत!

मंगळवारी ‘सामना’तून नियुक्त्या, अन बुधवारी ठाकरे गटाला हादरा, शिलेदार शिंदेंच्या शिवसेनेत!

कल्याण : अंबरनाथमधील उबाठा गटाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बुधवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे मंगळवारीच ठाकरे गटाने अंबरनाथ शहरातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची सामनातून घोषणा केली, तर बुधवारी ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.

अंबरनाथ शहरातील ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची मंगळवारी सेनेचे मुखपत्र सामनातून घोषणा करण्यात आली होती. मात्र याला २४ तासही उलटत नाहीत, तोच उबाठा गटाचे अंबरनाथचे उपशहरप्रमुख अनिल भोईर, युवासेना सरचिटणीस योगेश हातेकर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.

मुख्यमंत्र्यांना जाहीर सभेतून शिवीगाळ करणं महागात, मुंबईच्या माजी महापौरांवर गुन्हा
यापूर्वीही ठाकरे गटाच्या शहरप्रमुखांसह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली होती. त्यामुळे ठाकरे गटाला शहरात पदाधिकारीच मिळत नसल्याचं चित्र आहे.

नार्वेकर-फाटक सुरतमध्ये शिंदेंना का भेटले? सुनील प्रभूंना वकिलांचा सवाल, सुनावणीत खडाजंगी
ठाणे जिल्हा आणि त्यातही अंबरनाथ शहरात शिवसेनेचा दबदबा आहे. एकनाथ शिंदे यांची शहरावर एकहाती पकड आहे. त्यांच्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही पकड आणखी मजबूत केली. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आमदार, माजी नगराध्यक्ष आणि काही माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी सोडल्यास एक मोठा गट त्यांना पाठिंबा देण्यापासून दूर राहिला होता. त्यामुळे शिंदे सध्या शाखांवर तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नजर ठेवून आहेत.

संजय राऊतांच्या निकटवर्तीयाची मुख्यमंत्र्यांना जाहीर सभेत शिवीगाळ, दत्ता दळवींना पोलिसांकडून अटक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed