गोपाल पालीवाल, जळगाव : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर रस्त्यावर कित्येक दिवसांपासून मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. अनेकदा छोटे मोठे अपघात या खड्ड्यांमुळे होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे यासाठी चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील रहिवासी तरुण उर्वेश साळुंखे याने चक्क खड्ड्यात साचलेल्या पाण्याच्या डबक्यात बसून अंघोळ करून प्रशासनाचे लक्ष वेधले. बुधवार सकाळी ११.४५ ते ३ वाजेपर्यंत उर्वेश साळुंखे याने खड्ड्यात बसून आंदोलन केले.
विशेष म्हणजे, या मतदार संघातील खासदार रक्षा खडसे या ठिकाणी साडेतीन तासानंतर आल्या. त्यांनी या रस्त्याचे काम लवकर चालू होईल, असे उर्वेश साळुंखे यास शब्द देऊन आंदोलन सोडण्यास विनंती केली. तसेच रस्त्याच्या कामात येणार्या अडचणी, काही ठिकाणी काम सुरू असल्याचे सांगितले.अपघाताचा धोका
विशेष म्हणजे, या मतदार संघातील खासदार रक्षा खडसे या ठिकाणी साडेतीन तासानंतर आल्या. त्यांनी या रस्त्याचे काम लवकर चालू होईल, असे उर्वेश साळुंखे यास शब्द देऊन आंदोलन सोडण्यास विनंती केली. तसेच रस्त्याच्या कामात येणार्या अडचणी, काही ठिकाणी काम सुरू असल्याचे सांगितले.
अपघाताचा धोका
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर या रस्त्यावर अत्यंत मोठ्या प्रमाणात रहदारी असते. तरीही रस्त्याची दुरवस्था कित्येक महिन्यांपासून जैसे थे आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर खड्डे आहेत. दररोज या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढते असल्यामुळे अपघातांचा धोकादेखील वाढला आहे. सामान्य लोकांना तर दुचाकी चालविताना कसरत करावी लागत आहे.
या समस्येसाठी बुधगाव येथील रहिवासी उर्वेश साळुंखे या तरुणाने साडेतीन तास या रस्त्यावरील खड्ड्यात बसून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा प्रयत्न केला. या रस्त्याची काम लवकरात लवकर चालू होईल असा खासदार रक्षा खडसे यांनी शब्द दिला. या अनोख्या आंदोलनाला असंख्य नागरिकांनी पाठिंबा दर्शविला होता.
Read Latest Maharashtra News And Marathi News