• Mon. Sep 7th, 2026

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लोहगाव विमानतळावर आगमन

ByMH LIVE NEWS

Nov 29, 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लोहगाव विमानतळावर आगमन

पुणे, दि.29 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज दुपारी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंह, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त रितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यावेळी उपस्थित होते.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed