मुंबई: एकीकडे अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे असतानाच दुसरीकडे मुंबईतील अवकाळी पावसामुळे वायूप्रदूषणाचा त्रास कमी झाला आहे. हवेची गुणवत्तेत समाधानकारक सुधारणा झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दिवाळी काळात मुंबईतील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली होती. उच्च न्यायालयानेही फटाके फोडण्यास केवळ दोन तासांची मर्यादा घालून दिली होती. बीएमसीकडूनही धूळप्रदूषण कमी करण्यासाठी पावले टाकण्यात आली. मात्र, आता धुळप्रदूषणाने बेजार झालेल्या मुंबईकरांच्या मदतीला अवकाळी पाऊस धावून आला आहे.
अवकाळी पावसामुळे मुंबईतील बीकेसी वगळता सर्व भागातील AQI १०० च्या खाली आला आहे. बीकेसीचा AQI १०३ वर आहे. पुढील तीन ते चार दिवस हवा गुणवत्ता चांगल्या स्थितीत राहणार आहे. बऱ्याच राजकीय कार्यक्रमांना अवकाळी पावसाचा फटका बसला. आज देखील हवामान खात्यामार्फत मुंबईत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकूण मुंबई – 60 AQI
कुलाबा – 76
भांडुप – 37
मालाड – 35
माझगाव – 47
वरळी – 33
बोरिवली – 65
बीकेसी – 103
चेंबूर – 89
अंधेरी – 67
नवी मुंबई – 53
हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?
शून्य ते ५० एक्यूआय – उत्तम
५० ते १०० एक्यूआय – समाधानकारक
१०१ ते २०० एक्यूआय – मध्यम
२०१ ते ३०० एक्यूआय – खराब
३०१ ते ४०० एक्यूआय – अतिशय खराब
४०१ ते ५०० एक्यूआय – गंभीर