• Sat. Sep 21st, 2024
हवेचा दर्जा खालावला; प्रदूषण करणाऱ्या ६०४ जणांना महापालिकेचा दणका, दंडाची रक्कम वाचून व्हाल चकित

पिंपरी: राज्यातील विविध शहरांसह पिंपरी-चिंचवडमधील हवेचा दर्जाही खालावला आहे. त्यामुळे प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे बांधकाम व्यावसायिक, दुकानदार, वाहनचालक, विक्रेते आदी ६०४ जणांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १३ दिवसांत ५३ लाख रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे.
पुणे ते लोणावळा रेल्वेचा वेग वाढणार; स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेचे काम पूर्ण, ‘असा’ होणार फायदा
प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार पिंपरी महापालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी दोन याप्रमाणे १६ विशेष वायू प्रदूषण देखरेख पथके तैनात केली आहेत. उपअभियंता, स्वच्छता निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक आदींचा पथकात समावेश आहे. शहरात उघड्यावर कचरा जाळला जातो. ढाबा, बेकरी, हॉटेलांतून वायू प्रदूषण होते. बांधकामांच्या ठिकाणी हिरवी जाळी लावण्यात येत नाही, पाणी शिंपडले जात नाही. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या संस्था, कारखाने, बांधकाम व्यावसायिकांवर पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे.

आस्थापनांना भेट देऊन छायाचित्रे काढण्यात येत आहे. प्रसंगी चित्रिकरणही केले जात आहे. नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. दरम्यान पथकाने गेल्या १३ दिवसांत ६०४ जणांना नोटीसा बजावून ५२ लाख ९९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. नोटीसा देऊनही उपाययोजना न केल्याने काही बांधकामे सील करण्यात आली आहेत. या कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी चार उपायुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. कारवाईमुळे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

पाऊस पडला, मुलाखत रद्द केली; पण राज ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलंच

शहरातील आठही प्रभागांत १६ विशेष वायू प्रदूषण देखरेख पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असं पिंपरी महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed