• Mon. Nov 25th, 2024
    फुकट्या प्रवाशांवर पीएमपीची कारवाई; तब्बल ‘इतका’ दंड वसूल, वाचा सविस्तर…

    पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. गेल्या दहा महिन्यांत फुकट्या प्रवाशांकडून सव्वा कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महिन्याला अंदाजे दहा लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत ‘पीएमपी’कडून १७०० बसच्या माध्यमातून सार्वजनिक बससेवा दिली जाते.
    धक्कादायक! वाढदिवशी आवडती भेटवस्तू दिली नाही; पत्नीला राग अनावर, पतीवर शस्त्राने हल्ला, दुर्दैवी मृत्यू
    या बसमधून दिवसाला साधारण १२ ते १३ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामधून दीड ते दोन कोटींच्या दरम्यान उत्पन्न मिळते. तरीही पीएमपी तोट्यात असून प्रत्येक वर्षी संचलन तूट वाढत आहे. ‘पीएमपी’कडून बसमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईसाठी तिकीट तपासणीस (चेकर) ची पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांकडून वेगवेगळ्या मार्गावर अचानक जाऊन बसची तपासणी केली जाते. त्यामध्ये दररोज दीड ते दोन हजारांच्या जवळ फुकटे प्रवाशी सापडतात.

    शिक्षक भरतीची पुढील प्रकिया होत नाहीय, किती वेळ वाट बघायची; महिलेचा प्रश्न, दिपक केसरकरांचा पारा चढला

    कमी रकमेसाठी अधिक दंड
    ‘पीएमपी’चे तिकीट कमीत कमी पाच रुपयांपासून जास्तीत जास्त ८० रुपयांपर्यंत आहे. लांब पल्ल्याच्या अंतराच्या तिकिटात थोडीफार रक्कम अधिक असू शकते. मात्र, दहा ते वीस रुपये वाचविण्याच्या नादात तपासणी पथकाच्या हाती लागल्यावर पाचशे रुपये दंड भरावा लागतो. दर महिन्याला ‘पीएमपी’ला फुकट्या प्रवाशांच्या कारवाईतून १० ते १२ लाखांचे उत्पन्न मिळते. फुकट्या प्रवाशांना महाविद्यालयीन तरुण-तरुणी जादा सापडत असल्याचे ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पीएमपीत ३५० कर्मचारी तिकीट तपासण्याचे काम करतात. त्यांना यासाठी पाच खासगी चारचाकी वाहने देण्यात आलेली आहेत. तिकीट चेकरची पथके ३७९ पेक्षा अधिक मार्गांवर जाऊन बसची तपासणी करतात. विनातिकीट आढळून आल्यास प्रवाशांकडून दंड वसूल केला जातो.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed