• Sat. Sep 21st, 2024

घाटातही रेल्वेगाड्या धावणार सुपरफास्ट, कर्जत- कसारा यार्ड विस्तारणीच्या कामाला वेग

घाटातही रेल्वेगाड्या धावणार सुपरफास्ट, कर्जत- कसारा यार्ड विस्तारणीच्या कामाला वेग

म. टा. प्रतिनिधी मुंबई : उत्तर भारतात ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांची गती वाढवणे आणि विलंबाने धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमुळे लोकल फेऱ्यांवर परिणाम होतो. यावर उपाय म्हणून मध्य रेल्वेकडून कसारा यार्ड विस्तारीकरण आणि कर्जत-पळसदरी चौथ्या मार्गासह कर्जत यार्ड विस्ताराचे काम करण्यात येत आहे. कसारा यार्ड विस्तारीकरणाचे काम ७८ टक्के पूर्ण झाले असून कर्जत यार्ड आणि नवी मार्गिका उभारणीचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. यार्ड विस्तारीकरणामुळे मेल-एक्स्प्रेसचा वेग वाढेल त्याचबरोबर कर्जत – कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान लोकलसह मालगाडी, मेल-एक्स्प्रेस आणि पॅसेंजर यांची हाताळणी अधिक वेगवान होणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.

कसारा यार्ड विस्तारीकरण
– अपेक्षित खर्च – १९.९९ कोटी
– सद्यस्थिती – ७८ टक्के
कामाचे स्वरूप – यार्डातील डाऊन मार्गिका क्रमांक १, २, ३ ची लांबी ८४४ मीटरपर्यंत वाढवणे.
– फलाट क्रमांक १ आणि २चा विस्तार आणि रुंदीकरण करणे
– यार्डातील अप मार्गिका क्रमांक ४, ५, ६ ची लांबी वाढवणे.

चिनी न्यूमोनियामुळे भारत अलर्ट ! मोदी सरकारकडून राज्यांना सूचना , कितपत धोकादायक ठरु शकतो?
पूर्ण झालेली कामे
– फलाटावरील छत उभारणीचे काम इगतपुरी टोकाला १२४ मीटर आणि सीएसएमटी दिशेकडील १४४ मीटर.
– फलाटावरील खांब उभारणी
– सर्व पायाभरणीची कामे

कामे सुरू
– रेल्वे उड्डाणपूलाचे पाडकाम करून त्याची पुनर्बांधणी.
– फलाट विस्तार आणि रुंदीकरण

महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला नाही, २६-२२ च्या चर्चांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण

कर्जत यार्ड विस्तार / कर्जत-पळसदरी चौथी मार्गिका
– अपेक्षित खर्च – ७४.५३ कोटी
– प्रकल्प सद्यस्थिती – ६० टक्के

कामाचे स्वरूप
– लोकल उभी राहणाऱ्या मार्गिका क्रमांक १,२,३ ची लांबी वाढवणे.
– यार्ड मार्गिका २,३,४,५ आणि ६ ची लांबी वाढवणे
-नवी सातवी मार्गिका उभारणे
– कर्जत-लोणावळा मुख्य मार्गातून कर्जत-खोपोली मार्ग स्वतंत्र करणे
– सीएसएमटी आणि लोणावळा दिशेला प्रत्येकी एक पादचारी पूल उभारणे
– कर्जत ते पळसदरी नवी मार्गिका

पूर्ण झालेली कामे
– ८ लहान पुलांचे विस्तारीकरण
– लोकल उभी करण्यासाठी मार्गिका क्रमांक ३ चे काम
– लोकल उभ्या करण्यासाठी २ मार्गिकांचा स्थलांतर
-लोणावळा दिशेकडील पादचारी पूलाचे काम पूर्ण झाले असून तो प्रवाशांसाठी खुला आहे

सुरू असलेली कामे
– सीएसएमटी दिशेला पादचारी पूल उभारणी
– लोकल उभी करण्यासाठी नवी मार्गिका उभारणे
– कर्जत ते पळसदरीदरम्यान नवी मार्गिका
– विद्युतीकरणाची चाचणी

रेल्वेचं काम रखडलं, प्रीतम मुंडेंनी थेट अंमळनेर स्थानक गाठलं आणि रेल्वेमंत्र्यांनाच फोन केला

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed