• Sat. Sep 21st, 2024

गिरीश महाजनांकडून आजारावर प्रश्नचिन्ह, एकनाथ खडसेंनी थेट नोटीस पाठवली, म्हणाले…

गिरीश महाजनांकडून आजारावर प्रश्नचिन्ह, एकनाथ खडसेंनी थेट नोटीस पाठवली, म्हणाले…

जळगाव: मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक संघर्ष टोकाला पोहोचला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या आजाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मंत्री गिरीश महाजन यांनी माझे जोडे मारण्याचे आव्हान स्वीकारावे. मी त्यांना मारण्यासाठी नुकतेच नवीन जोडे विकत घेतले आहेत. त्यामुळे जोडे मारायला कधी येऊ याची तारीख गिरीश महाजन यांनी कळवावे, असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आजारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी एकनाथ खडसे यांची आज जळगावत पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेत खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर जहरी शब्दात टीका केल्याचा पाहायला मिळालं.

गिरीश महाजन सारख्या पिल्लांना मीच मोठ केलं.. ते मला बाबा म्हणायचे…ते मला बाप म्हणायचे.. पण त्यांनी आता बाप बदलला आहे, अशी जोरदार टीका खडसेंनी महाजन यांच्यावर केली.

गिरीश महाजन यांना मी अब्रू नुकसान संदर्भात नोटीस बजावली आहे. त्यांची किंमत माझ्याकडे एक रुपयाची आहे. त्यामुळे तशी नोटीस बजावली असून त्याला गिरीश महाजन यांनी सामोरे जावे. गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरच प्रश्न उपस्थित करत आहे.मंत्री गिरीश महाजन हे कोत्या मनाचे आहेत. आजारातून बरं झाल्यामुळे माझा पुनर्जन्म झाला आणि अशा पद्धतीने ते जर आजारावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत असतील तर हे चुकीचे आहे, असं खडसेंनी म्हटलं.
देशाच्या ऐक्यासाठी संघर्ष करु, निराशेवर मात करुन धैर्यानं पुढं जाऊ, शरद पवारांचं भर पावसात मार्गदर्शन
एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न उपस्थित करत जळगाव जिल्ह्यातील विकास कामा बाबतही जिल्ह्यातील तिन्ही मंत्री आणि सर्व आमदारांना आव्हान दिलं आहे. जिल्ह्यात एक जरी धरण यांनी पूर्ण केला असेल तर मला दाखवून द्यावं, एक जरी प्रकल्प यांनी जिल्ह्यात पूर्ण केला असेल तर दाखवून द्यावा असं थेट आव्हान जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्री व सर्व आमदारांना एकनाथ खडसे यांनी दिलं आहे
नातवंडांना भेटायचंय तर दीड कोटी दे, बहिणीकडे खंडणीची मागणी, जीवे मारण्याचीही धमकी, पुण्यात खळबळ
मंत्री गिरीश महाजन हे जामनेर तालुक्यातील आहेत. त्यांनी त्यांच्या जामनेर तालुक्यातील पहूर किंवा शेंदुर्णी या दोन गावांना तालुका म्हणून जाहीर करून आणावे. मी त्यांचा जळगावातील मुख्य चौकात जाहीर सत्कार करेल असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
मध्यरात्री बेल वाजली; महिलेने दरवाजा उघडताच ५ जण घुसले, आधी मारहाण नंतर ऐवजासह तरुणीला पळवलं, काय घडलं?
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed