• Sat. Sep 21st, 2024
विदर्भातील पंढरी कार्तिकी एकादशीनिमित्त दुमदुमली, संतनगरी शेगावात भक्तांचा महापूर

बुलढाणा : आज कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी) आणि त्यात गुरुवारचा योग जुळून आल्याने विदर्भातील प्रति पंढरपूर असलेली संतनगरी शेगावमध्ये भक्तांची मांदियाळी जमली आहे. जे भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात जाऊ शकत नाहीत, ते शेगावमध्ये येऊन दर्शन घेतात. कार्तिकी एकादशीनिमित्त संत नगरी शेगावात भक्तांची मोठी गर्दी जमली आहे. आज दिवसभरात शेगावात भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे कार्तिकी एकादशीनिमित्त हजारो भाविक दाखल झाले आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त दिवाळीनंतर दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनाकरिता लाखो भाविक पंढरपूरला जात असतात. परंतु जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, ते भाविक मात्र विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव येथे दर्शनाकरता येतात.

आज सकाळपासूनच भाविकांनी श्रींच्या दर्शनाकरिता गर्दी केली आहे. सकाळी ५ वाजता काकडा आरती झाली, तर सात वाजता मुख्य आरती झाली असून, दुपारी श्रींचा रजत मुखवटा पालखी सोहळा, व नगर परिक्रमा होणार आहे. मंदिर व्यवस्थापनाकडून भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या समाधी दर्शनासाठी एक ते दीड तासाचा वेळ लागत असून मुखदर्शनाकरिता वीस मिनिटांचा वेळ लागत आहे.

नवी मुंबई मेट्रो अखेर धावली, पण महाग तिकिटांवरुन प्रवासी नाराज, नेमकं म्हणणं काय?
एकंदरीत संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्री संत गजानन महाराज व विठुरायाच्या चरणी लीन होण्याकरिता शेगाव मध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असताना कार्तिक महिन्यात आलेला गुरुवारचा योग आणि एकादशी हे सर्वच साधून भाविक मोठ्या संख्येने श्रींचे दर्शन घेत आहेत.

फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची सपत्नीक शासकीय महापूजा, घुगे दाम्पत्य मानाचे वारकरी
नित्य क्रमाने श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने श्री कलश दर्शन, श्री श्रीमुख दर्शन, श्री समाधी दर्शन असे दर्शन भाविकांकरता खुले आहे. भाविकांकरता सकाळी नऊ ते रात्री नऊच्या क्रमाने होणारा महाप्रसाद वितरित केला जात आहे.

शेगावकरांसाठी रेल्वेच्या डब्यात एसी रेस्टॉरंट; प्रसिद्ध कचोरीही मिळणार वेगळ्या ढंगात

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed