• Sat. Sep 21st, 2024

वंचितच्या कार्यक्रमाला राहुल गांधींना निमंत्रण, २५ वर्ष जुनी आठवण, प्रकाश आंबेडकरांचं पत्र

वंचितच्या कार्यक्रमाला राहुल गांधींना निमंत्रण, २५ वर्ष जुनी आठवण, प्रकाश आंबेडकरांचं पत्र

मुंबई : मुंबईत येत्या २५ नोव्हेंबरला होणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या संविधान सन्मान महासभेसाठी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासाठी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहिले असून या पत्रात प्रकाश आंबेडकर यांनी १९९८ मध्ये भारिप बहुजन महासंघाने काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, २५ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे होणाऱ्या संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण राहुल गांधी यांना पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून हे निमंत्रण पाठविले असून या पत्रात त्यांनी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत केलेल्या प्रयत्नांचे काँग्रेसचे कौतुकही केले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय खोलात, कन्या-सुनेवर आरोपपत्र, काय आहे कारण?

काय म्हटलं आहे पत्रात?

सध्या देशात आरएसएस-भाजप, ज्यांचे अस्तित्व केवळ घटनात्मक मूल्य आणि आदर्श नष्ट करण्यावर आधारित आहे, यांच्याशी लढण्याच्या आपल्या दोघांच्या वचनबद्धतेच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या आधारावरून, मी वंचित बहुजन आघाडी या माझ्या पक्षाच्यावतीने तुम्हाला संविधान सन्मान महासभेचे निमंत्रण देतो. तुमच्या संबोधनादरम्यान तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो लोकांना संबोधित करण्याची आणि भारताच्या भविष्याबद्दल तुमची दृष्टी त्याबाबतची भूमिका मांडण्याची संधी यानिमित्ताने मिळेल, असे आंबेडकर यांनी पत्रात म्हटले आहे.

इतिहास विसरु नका; जरांगेंची बाजू घेत आंबेडकरांनी भुजबळांना ऐकवलं

Read Latest Mumbai Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed