• Sat. Sep 21st, 2024
लोकल प्रवाशांच्या त्रासात भर पडणार, गर्डर उभारणीसाठी २० दिवसांचा रात्रब्लॉक, ब्लॉक कधीपासून?

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमसह पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी २७ नोव्हेंबरपासून २० दिवसांचा ब्लॉक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ब्लॉक कालावधीत लोकल फेऱ्या रद्द राहणार असल्याने येत्या आठवड्यापासून प्रवाशांच्या त्रासात भर पडण्याची शक्यता आहे. ब्लॉक वेळेत रेल्वेगाड्यांवर किमान परिणाम होण्यासाठी रात्रकालीन ब्लॉकचे नियोजन केले आहे. रोज सरासरी ३-४ तासांत ब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात ब्लॉकचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.

९० मीटर लांबीचा गर्डर

-मुंबई महापालिका आणि पश्चिम रेल्वेकडून गोखले पुलाची उभारणी करण्यात येत आहे.

-गोखले पुलाचा गर्डर साधारण ९० मीटर लांबीचा आहे.

-गर्डरचे सुटे भाग एकत्र करून त्यांची जोडणी गोखले पुलाजवळ करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे.

-जमिनीपासून २५ मीटर उंचीवर गर्डर टाकण्यात येणार आहे.

-गर्डरचे वजन सुमारे १३०० टन असल्याने विशेष क्रेनच्या मदतीने गर्डर उभारण्यात येणार आहे.

-४८ वर्षांपूर्वी गोखले पूल उभारण्यात आला होता. नव्या पूलासाठी सुमारे ९० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

भारताचा संघ जाहीर झाला पण कोण असणार प्रशिक्षक, द्रविडच्या जागी कोण असणार पाहा…
नवीन पुलाचा प्रवास

-१९७५ -गोखले पूलाची उभारणी (८० मी. लांब आणि २५ मी. रुंद)

– ३ जूलै २०१८ -पेव्हर ब्लॉक- केबलच्या भाराने पुलाचा पादचारी भाग कोसळला

– १ नोव्हेंबर २०२२ – मुंबई महापालिकेचे वाहतूक पोलिसांना पत्र

– ७ नोव्हेंबर २०२२ – पूल वाहतुकीसाठी बंद

– १२ नोव्हेंबर २०२२ – गोखले पुलाच्या उभारणीसाठी निविदा

– डिसेंबर २०२२ – पुलाचे पाडकाम सुरू

– मार्च २०२२ – पुलावर शेवटचा हातोडा

– ऑक्टोबर २०२३ – पुलाची गर्डर उभारणी अंशत: पूर्ण

– फेब्रुवारी २०२४ – महापालिकेकडून पूल खुला होण्याचे साधारण नियोजन

क्रिकेटमध्ये आता नवीन नियम, संघाला बसणार पाच धावांचा दंड, पाहा काय आहे हा नवीन नियम…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed