म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: अन्न औषध प्रशासनातर्फे मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील पान टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या दुकानात सापडलेला हजारो रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि इतर तंबाखुजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. शिवाय, या टपऱ्याही सील करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी बाजार समिती या पानटपऱ्या सुरू करण्यासाठी संबंधितांना परवानगी देत असल्याने समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुंबई एपीएमसीतील पाचही बाजारांमध्ये जवळपास १३० पानटपऱ्या आहेत. यामधील १०० टपऱ्यामंध्ये प्रतिबंधित गुटखाविक्री बिनधास्त होत असते. काही टपऱ्यांवर तर चरस गांजाही मिळत असल्याची चर्चा आहे. यापैकी अनेक पानटपऱ्यांचे मालक एक आणि चालवणारे दुसरेच आहेत. भाडेतत्त्वावर या पानटपऱ्या चालवल्या जात आहेत. मालमता विभागाच्या अधिपत्याखाली त्या सुरू आहेत. अन्न औषध प्रशासनातर्फे दोन वर्षांत जवळपास ४० ते ५० पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. अन्न औषध प्रशासनाने कारवाई करूनसुद्धा बाजार समितीचा मालमत्ता विभाग २५ हजार रुपये दंड घेऊन पुन्हा पानटपऱ्या सुरू करण्यासाठी परवानगी देत आहे. त्यामुळे अन्न औषध प्रशासन व एपीएमसी प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गुटखा आणि नशेचे पदार्थ बिनधास्तपणे विकले जात आहेत, मार्केटमध्ये जवळपास १० ते २० गोणी गुटख्याचा खप असून शौचालय, मार्केटमधील विविध विंगमध्ये गुटखाविक्री केली जात आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. संपूर्ण नवी मुंबईत जेवढा गुटखा विकला जात नाही, तेवढा गुटखा एपीएमसी परिसरात विकला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मार्केटमध्ये जवळपास १० ते १५ हजार परप्रांतीय कामगार आणि किरकोळ व्यापारी अनधिकृतपणे राहात असल्याने सर्वांत जास्त गुटखाविक्री येथे होत असल्याचे सांगितले जाते. एपीएमसी पोलिस व अन्न औषध प्रशासन विभागाकडून वारंवार एपीएमसी प्रशासनाला पत्र देऊनही यावर कारवाई होत नाही, असे काही व्यापाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
Read Latest Maharashtra News And Marathi News