• Sat. Sep 21st, 2024

उद्योजक सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु

उद्योजक सायरस पूनावाला यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु

पुणे : जगातील नामांकित सीरम इन्स्टिट्यूटसह सायरस पूनावाला ग्रुपचे चेअरमन आणि व्यवस्थापकिय संचालक सायरस पूनावाला काल (१६ नोव्हेंबर) ला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती रुबी हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून मिळाली आहे. सायरस पूनावाला यांचं सध्याचं वय ८२ असून त्यांना काल ह्रदयविकाराचा सौम्य धक्का बसला होता.
पुण्यात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू; एसटी, दुचाकीला वाचवताना पिकअप खड्ड्यात

रुबी हॉल हॉस्पिटल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार १६ तारखेला त्यांना सौम्य असा हृदयविकाराचा झटका आला होता. रुबी हॉल क्लिनिकचे डॉ. परवेझ ग्रांट यांनी सायरस पूनावाला यांना ह्रदयविकाराचा सौम्य धक्का बसला होता आता त्यांची प्रकृती झपाट्यानं सुधारत असल्याचं म्हटलं. रुग्णालयाचे सल्लागार अली दारुवाला यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार डॉ. सायरस पुनावाला यांना १६ नोव्हेंबरला ह्रदयविकाराचा सौम्य धक्का बसला होता. त्यांना आज सकाळी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं. डॉ. परवेझ ग्रांट,डॉ. माकले आणि डॉ. अभिजीत खर्डेकर यांच्या निगराणीखाली सायरस पूनावाला यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली, आता त्यांची प्रकृती वेगानं सुधारत असल्याची माहिती देखील अली दारुवाला यांनी दिली.
मराठा समाज मागास आहे का? राज्य मागासवर्ग आयोग चाचपणी करणार, मुख्यमंत्र्यांचं पत्र

सीरम इन्स्टिट्यूट चे सर्वेसर्वा सायरस पूनावाला यांची उद्योग क्षेत्रासह राजकीय क्षेत्रात ही मोठी ओळख आहे. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांसोबत त्यांची जवळची मैत्री आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी शरद पवार येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
गॅलरीच्या लोखंडी जाळीत बाळ अडकलं, दरवाजाही बंद झाला; अग्निशमन दलाची धाव, पाच मिनिटात बाळाची सुटका
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed