• Sat. Sep 21st, 2024
ऊसदर आंदोलनावर तोडगा नाहीच, तिसरी बैठकही निष्फळ; राजू शेट्टींनी आंदोलनाची पुढची दिशा सांगितली

कोल्हापूर: गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनावर तोडगा निघेल असे वाटत असतानाच आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्ह्यातील कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यातील तिसरी बैठक देखील निष्फळ ठरले आहे. आम्ही आमच्या मागणीवर ठाम असून मागणी मान्य न झाल्यास येत्या रविवारी चक्काजाम आंदोलन होईल. याशिवाय ऊसतोडी देखील बंद राहणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. ते आज बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते.

तिसरी बैठकही निष्फळ:

गतवर्षातील ऊसाला चारशे रुपये द्या तसेच यंदाच्या उसाला पहिली उचल साडेतीन हजार रुपये द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करत आहे. तर साखर कारखानदार ही मागणी मान्य करत नसल्याने दिवसेंदिवस हे आंदोलन उग्र होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे मध्यस्थी करत साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या बैठक घडवत असून गेल्या दोन बैठकच्या मध्ये कोणताही निर्णय झाला नाही. यामुळे आजच्या तिसरा बैठकीकडे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

भुजबळांना पाडाल तर ओबीसी समाज १६० मराठा आमदारांना पाडल्याशिवाय राहणार नाही: प्रकाश शेंडगे
दुपारी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात बैठक पार पडली या बैठकीस माजी खासदार राजू शेट्टी, पालकमंत्री हसन मुश्रीफ ,आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील साखर कारखानदार व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र तब्बल तीन ते चार तास चाललेली ही बैठक देखील निष्फळ ठरली असून राजू शेट्टी हे आपल्या मागणीवर ठाम आहेत.

रविवारी जिल्हा चक्काजाम आंदोलन होणारच :

राजू शेट्टी यांनी बैठकीतून बाहेर पडत माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली असून, बराच काळ चर्चा झाली परंतु या चर्चेतून काही निष्पण झाले नाही. यंदाच्या हंगामात ज्या कारखानदारांनी ३ हजार दर दिला आहे. त्यांनी ३१०० रुपये करावी तर ज्यांनी ३२०० केला आहे त्यांनी तोच दर ठेवावा असे कारखानदारांकडून प्रस्ताव देण्यात आला होता. तर गेल्या वर्षी तुटलेल्या उसाच्या बाबतीत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमावी आणि २१ तारखेपर्यंत कमिटीला किती देता येते या संदर्भामध्ये माहिती सादर करावी असे सांगण्यात आले आहे. मात्र याला आम्ही विरोध केला आहे. कारण ही समिती वेळ काढू असणार आहे असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.

ओबीसी एल्गार मोर्चाची जय्यत तयारी, वाहतूक मार्गांमध्ये महत्त्वाचे बदल, पर्यायी मार्ग कोणते?
कानपूर शुगर टेक्नॉलॉजी कानपूर यांच्या उत्पादन शुल्काच्या खर्चाचे जे निकष आहेत त्या निकषाप्रमाणे उत्पादन खर्च करावा लागेल त्याला काही कारखानदारांचा आक्षेप आहे. परंतु यांनी केलेल्या उत्पादन खर्च काढलेला आहे याला मान्यता नाही. एका बाजूला ११.८० रिकव्हरी असणारे कारखाने एफआरपी पेक्षा ५६२ रुपये जास्त देत आहेत आणि दुसऱ्या बाजूला साडेबारा ते तेरा रिकव्हरी असणारे कारखाने त्याचा तोडणी वाहतूक खर्च कमी आहे. तरीही कारखानदार ऊसाचा दर द्यायला तयार होत नाहीत. ते जे निर्णय घेतली याला आमची मान्यता नाही म्हणून जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत ऊस तोडी बंदच राहणार असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तसेच येत्या रविवारी जिल्हा चक्काजाम आंदोलन होणारच असेही शेट्टी म्हणाले आहेत.

आमच्याच ऊसावर तुम्ही बोनस घेतला, मग आमच्या पदरात काय रे?; शेतकऱ्यांचा उद्रेक, अधिकारी चिडीचूप

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed