• Sat. Sep 21st, 2024

महाराष्ट्रातील अवलियाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका; कोतवाल पक्ष्याचे छायाचित्र टिपले अन् मिळवला एफआयआयएन पुरस्कार

महाराष्ट्रातील अवलियाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका; कोतवाल पक्ष्याचे छायाचित्र टिपले अन् मिळवला एफआयआयएन पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर: देश आणि जगभरातील जंगलांची भ्रमंती करून एकाहून एक सरस वाइल्डलाइफ फोटो काढत आजवर १३२ हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत पुरस्कार मिळवणाऱ्या बैजू पाटील यांच्या ‘विंग्ज ऑन फायर’ या बर्ड कॅटेगिरीतील ड्रोंगो म्हणजेच कोतवाल पक्ष्याच्या छायाचित्राला जगातील पहिले पारितोषिक मिळाले आहे.
ऊसदर आंदोलनावर तोडगा नाहीच, तिसरी बैठकही निष्फळ; राजू शेट्टींनी आंदोलनाची पुढची दिशा सांगितली
जागतिक स्तरावरील ‘एफआयआयएन’ हा पुरस्कार मिळाला. जगभरातून आलेल्या ८८०० फोटोंमध्ये बैजू यांच्या फोटोला पहिला मान मिळाला. पोर्तुगाल गाला येथे नुकताच पुरस्कार सोहळा पार पडला. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फोटोग्राफी विभागाचे बैजू पाटील हे विभागप्रमुख आहेत. बैजू पाटील गेल्या ३७ वर्षांपासून या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करत आहेत. वाइल्डलाइफ क्षेत्रातील अतिशय दुर्मिळ असे क्षण त्यांनी कॅमेऱ्यात टिपले आहेत. पुरस्कार प्राप्त पक्ष्याचा हा फोटो बैजू यांनी बीड जिल्ह्यातील धारूर येथे जाऊन काढला आहे.

मोरगावात मनोज जरांगेंचं दमदार स्वागत, तोफांची सलामी देत पुष्पवृष्टी

वास्तविक पाहता बैजू पाटील मागील चार वर्षांपासून हे क्षण टिपण्यासाठी सातत्याने या ठिकाणी जात होते. पण हवा तसा फोटो त्यांना मिळत नव्हता. फोटो घेण्यासाठी बैजू यांना आधी पक्ष्याच्या वागण्याचा सखोल अभ्यास करावा लागला. कुठल्या वेळेला हे पक्षी येतात. आग लागल्यानंतरही किडे खाण्यासाठी त्यांची नेमकी धडपड कशी असते याची पूर्ण माहिती घेतल्यानंतर त्या भागात तळ ठोकून मनासारखा क्षण कॅमेऱ्यात टिपेपर्यंत त्यांनी माघार घेतली नाही. शेवटी मागील वर्षी हा फोटो घेण्यात त्यांना यश मिळाले. हा पुरस्कार त्यांना मिळाल्याबद्दल बैजू पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed