• Mon. Nov 25th, 2024

    प्रेग्नन्सीचं ढोंग, रेल्वेने प्रवास करणाऱ्या पाच महिलांना बेड्या, कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल

    प्रेग्नन्सीचं ढोंग, रेल्वेने प्रवास करणाऱ्या पाच महिलांना बेड्या, कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल

    मुंबई : दिवाळी सुट्टीसाठी पश्चिम रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालवल्या आहेत. या गाड्यांना प्रचंड गर्दी असल्याने कन्फर्म तिकिटांसाठी वाजवीपेक्षा अधिक पैसे मोजायला काही प्रवासी तयार आहेत. अशातच कन्फर्म तिकीट आरक्षणाचा कोटा मिळवण्यासाठी थेट बनावट गर्भधारणा वैद्यकीय प्रमाणपत्राचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवंतिका एक्स्प्रेसमध्ये बनावट प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षण केलेल्या एक नाही तर चक्क पाच महिला प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाने बेड्या ठोकल्या आहेत.

    पश्चिम रेल्वेवरील सर्व प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास करता यावा यासाठी उपनगरी फेऱ्यासह नियमित आणि विशेष मेल-एक्स्प्रेसमध्ये विनातिकीट प्रवाशांसाठी मोहीम सुरू आहे. लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांमधील तिकीट तपासणीसाठी रेल्वे प्रशासनाकडून भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. चर्चगेट येथील भरारी पथकातील मुख्य तिकीट निरीक्षक मोहम्मद जाहिद कुरेशी, अब्दुल अझीझ यांना पाच महिला प्रवासी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राचा वापर करून आरक्षण केल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे.

    मुंबई सेंट्रल ते इंदूर अवंतिका एक्स्प्रेस (१२९६१) या गाडीत उपलब्ध जागेची चाचपणी करताना पाच महिला प्रवाशांचे ज्येष्ठ नागरिक कोट्यात आरक्षण असल्याचे या पथकाच्या लक्षात आले. वसई रोडमधील पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम (पीआरएस), वसई रोड यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सर्व पीएनआर एकाच मोबाइल क्रमांकाची नोंद करून बुक करण्यात आल्याचे उघड झाल्याची माहिती समोर आली, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी सांगितले.

    तेरी मेरी दोस्ती प्यार मे बदल गयी, खाकी वर्दीतच रील, महिला पोलिसाचं निलंबन
    अवंतिका एक्स्प्रेसमध्ये बोरिवली ते इंदूर आणि इंदूर ते बोरिवली आरक्षणासाठीचे सर्व अर्ज वैद्यकीय प्रमाणपत्रांसह जप्त करण्यात आले. त्यावेळी फॉर्मसोबत जोडलेली वैद्यकीय प्रमाणपत्रे बनावट असल्याचे दिसून आले. बनावट प्रमाणपत्राच्या आधारे तिकीट आरक्षण झाल्याने पाचही पीएनआर रद्द करण्यात आले आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

    भाऊ फ्लॅटवर आलाय, पुण्यात तरुणाला घरी बोलवून नग्न नाचवलं, अश्लील व्हिडिओ शूट करुन व्हायरल

    दोघांना अटक

    पश्चिम रेल्वेच्या भरारी पथकाने बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांखाली ज्येष्ठ नागरिक कोट्याचा गैरवापर करून निश्चित आरक्षण करून देणाऱ्यांचे रॅकेट शोधून काढले आहे. वसई रोडमधील बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या हिरेंद्र घनश्याम कानबार आणि विरारमध्ये राहणाऱ्या विष्णू सोहलाल खाटीक या दोघांना अटक करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांच्या तपासाअंती ही बाब समोर आली आहे.

    जवानाचा कुटुंबासह अपघाती मृत्यू, १८ वर्षांनी न्याय, वृद्ध आई-वडिलांना जवळपास ५० लाखांची भरपाई मिळणार

    सतर्कतेमुळे बनाव उघड

    भारतीय दंड संहितेच्या कलम ४६८, ४७१, ४२० आणि ३४ आणि भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १३६ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राचे हे प्रकरण उघडकीस आले आहे.

    आंध्रप्रदेशच्या विजयनगरमध्ये दोन ट्रेन धडकल्या, रेल्वेचे तीन डबे रुळावरून घसरले

    Read Latest Mumbai Updates And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed