• Sat. Sep 21st, 2024
‘एसटी’चीही दिवाळी, १० दिवसांत तब्बल २०० कोटींचा महसूल; धनत्रयोदशीचा मुहूर्त फळला

मुंबई : वर्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीने बाजारात नवचैतन्य निर्माण केले आहे. शहरांसह गाव-खेड्यांमध्येही सणांचा आनंद ओसंडून वाहत आहे. शहरातील धकाधकीच्या आयुष्यातून निवांत वेळ काढून आप्तस्वकीयांसह, कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने शहरवासी गावांकडे रवाना झाले आहेत. राज्यात एसटी हीच जीवनवाहिनी असल्याने गेल्या दहा दिवसांत प्रवासी वाहतुकीतून सुमारे २०० कोटी रुपयांचा महसूल एसटी महामंडळाने मिळवला आहे. यामुळे प्रवाशांसह महामंडळाचीही दिवाळी उत्साहात साजरी होत आहे.

१ ते १० ऑक्टोबरदरम्यान महामंडळाने १९५ कोटी ७ लाख ४९ हजार रुपये महसूल मिळवला आहे. राज्यातील सहा एसटी प्रदेशांमध्ये बाजी मारणाऱ्या पुणे प्रदेशाने दहा दिवसांत ४७ कोटी ७१ लाखांचा महसूल मिळवला आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर प्रदेश (३९.२२ कोटी), नाशिक प्रदेश (३६.८३ कोटी), मुंबई प्रदेश (३२.१८ कोटी), अमरावती (२०.८६ कोटी) यांचा क्रमांक आहे. सर्वाधिक कमी म्हणजे १८ कोटी २५ लाखांचा महसूल नागपूर विभागाने मिळवला आहे.

भारताने नवव्या सामन्यात ९ गोलंदाज का वापरले, रोहित शर्माने अखेर खरं ते सांगितलंच…
७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि ५० टक्के तिकीट सवलतीची महिला सन्मान योजना यांमुळे यंदा एसटीला उदंड प्रवासी लाभणार, असा अंदाज महामंडळाला होता. धनत्रयोदशीच्या मुहूर्ताला हा अंदाज खरा ठरला. योग्य पद्धतीने केलेले गाड्यांचे नियोजन आणि गेल्या वर्षभरात आलेल्या नवीन गाड्यांचा ताफा यामुळे शुक्रवारी १४,५९८ बसगाड्या राज्यातील सर्व मार्गांवर धावत्या होत्या. शुक्रवारी महामंडळाने एकाच दिवसात २७ कोटी ६१ लाख ४९ हजारांचा महसूल मिळवला.

एसटीच्या यांत्रिक कर्मचाऱ्यांसह चालक-वाहक आणि सर्व वर्गातील कर्मचाऱ्यांमुळे हा पल्ला गाठता आला. गाड्यांची देखभाल-दुरुस्ती, योग्य नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी यामुळे हे शक्य झाले आहे. दिवाळीच्या प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीवर विश्वास दाखवला आहे. त्यासाठी सर्व प्रवाशांचे महामंडळातर्फे आभार.

– शेखर चन्ने, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

धनत्रयोदशीला एक कोटींची कमाई करणारे विभाग

विभाग कमाई (रुपयांत)

ठाणे – १,०३,८६,०००

छत्रपती संभाजीनगर – १,०४,४८,०००

बीड – १,१३,०८,०००

लातूर – १,१९,६५,०००

नांदेड – १,०९,४१,०००

कोल्हापूर – १,४०,०२,०००

पुणे – १,७६,५२,०००

सांगली – १,३०,९२,०००

सातारा – १,०२,३४,०००

सोलापूर – १,३४,२८,०००

अहमदनगर – १,०८,५८,०००

धुळे – १,३३,७७,०००

जळगाव – १,३५,५९,०००

नाशिक – १,२५,४२,०००

धनत्रयोदशीचा मुहूर्त फळला

एकूण मार्गस्थ बस : १४,५९८

एसटी महामंडळ उत्पन्न : २७,६१,४९,०००

योजनांमुळे एसटीची चांदी (१ ते १० नोव्हेंबर)

महिला सन्मान योजना : ३८ कोटी १८ लाख

अमृत ज्येष्ठ नागरिक योजना : २७ कोटी २९ लाख

ज्येष्ठ नागरिक योजना : ५ कोटी

सरकारकडून योजनांची प्रतिपूर्ती : ७० कोटी

नवव्या विजयासह भारताने रचला इतिहास, आतापर्यंत टीम इंडियाला ही गोष्ट कधीच जमली नव्हती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed