• Sun. Sep 22nd, 2024
डुकराच्या कळपाने रुग्णाच्या शरीराचे लचके तोडले; व्यक्तीचा मृत्यू, नांदेड रुग्णालय परिसरातील घटना

नांदेड: एकाच दिवसात नवजात बालकासह २४ रुग्णांच्या मृत्युच्या घटनेने शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या घटनेने राज्यातचं नाही तर देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर आता पुन्हा डुकराच्या कळपाने एका रुग्णावर हल्ला चढवत त्याच्या शरीराचे लचके तोडून ठार केले. ही धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी ही घटना शनिवारी सकाळी शासकीय रुग्णालय परिसरात उघडकीस आली आहे.
गाळ्यामध्ये नको तो उद्योग सुरू; पोलिसांना कुणकुण, गुप्त महितीवरून धाड टाकली, अन्…
या घटनेने रुग्णालयातील आरोग्य सेवे सोबतच तेथील स्वच्छता आणि डुकरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तुकाराम नागोराव कसबे ( वय ३५) असं या मयताचे नाव आहे. मयत तुकाराम कसबे हा नांदेड शहरा लगत असलेल्या धनगरवाडी येथील रहिवासी असून तो टीबी रुग्ण होता. ३० ऑक्टोबर रोजी प्रकृती खराब झाल्याने नातेवाईकांनी त्याला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ९ नोंव्हेबर रोजी त्याला सुट्टी देण्यात आली. त्यानंतर तुकाराम याने परभणी येथे मामाच्या घरी जातो म्हणून घरून निघून गेला. पण तो मामाकडे न जाता पुन्हा रुग्णालयात गेला. शनिवारी रात्री शौचालयासाठी तो रुग्णालय परिसरातील मोकळ्या जागेकडे गेला होता. यावेळी डुकराच्या कळपाने हल्ला करत त्याच्या शरीराचे लचके तोडले.

तोंड आणि पायाचे लचके तोडून टाकले होते. या हल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी काही रुग्णाच्या नातेवाईकांना युवकाचा मृतदेह चिन्नविन्न अवस्थेत आढळून आला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तुकाराम नागोराव कसबे या रुग्णाला शनिवारी सकाळी सात वाजता अपघात विभागात रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी दाखल केले होते. त्याच्या अंगावर जखमा होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या अंगावरील जखमा कशामुळे झाल्या आणि मृत्यूचे कारण हे शवविच्छेदनाच्या अहवालानानंतरच समोर येईल, अशी माहिती रुग्णालयाचे उप वैद्यकीय अधिक्षक डॉ. अभिजीत देवगरे यांनी दिली.

आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यकर्त्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रमाला मराठा बांधवांचा विरोध

२४ तासांत २४ मृत्यूच्या घटनेनंतर अनेक गोष्टी पुढे आल्या. अस्वच्छता, औंषधींचा तुटवडा, सोयी सुविधांचा अभाव यासोबतच १५० ते ३०० डुकरांचा मुक्त संचार या गोष्टी रूग्णालय आणि रुग्णांचे आरोग्य बिघडवण्यात कारणीभूत ठरल्याचे समोर आले. दरम्यान दोन दिवस महापालिका कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करण्यात आली होती. शंभर ते दिडशे डुक्करेही त्यांच्या मालकांनी पकडून नेले होते. त्यानंतर पुन्हा आहे तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. डुकरांची संख्या ही तितकीच आहे. महिनाभरानंतरही प्रशासनाला जाग आली नसल्याचे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed