• Sat. Sep 21st, 2024
कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे अमित शाहांच्या उपस्थितीत  ‘कमळ’ धरणार, टायमिंगची चर्चा

बीड : द कुटे ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे भाजपच्या वाटेवर असल्याचं समोर आलं आहे. कुटेंच्या भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कुटेंचा पक्षप्रवेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

महिन्याभरापूर्वी बीडमधील नामांकित कुटे ग्रुपचे मालक सुरेश आणि अर्चना कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट आणि कुटे ग्रुप यांची अँटी करप्शनच्या माध्यमातून वार्षिक तपासणी करण्यात आली होती. यानंतर जिल्ह्यात एक वेगळंच वादळ निर्माण झालं. कारण लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून एखाद्या कंपनीची चौकशी होते, तेव्हा ती कंपनी बुडीत असल्याची चर्चा रंगते. परंतु ज्ञानराधा मल्टिस्टेटमधून पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची झुंबड उडाली होती.

पवारांची साथ सोडणार, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या हाती ‘कमळ’, फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश
तेल, पशुखाद्य, डेअरी या उद्योगात असलेल्या द कुटे ग्रुपचा विस्तार देशभर होताना दिसत आहे. दिवाळीनंतर सुरेश कुटे हे दिल्लीत अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत राजकीय मांडवापासून दूर राहिलेल्या सुरेश कुटे यांची ज्ञानराधा मल्टिस्टेट अडचणीत आल्यानंतरच भाजप प्रवेशाची चर्चा होत असल्याने राजकीय वर्तुळात कुजबूज सुरु आहे.

मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांची प्रतिमा भाजपसाठी फायद्याची आणि तोट्याचीही | अजित वडनेरकर

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed