• Mon. Nov 25th, 2024
    मराठा आरक्षणासाठी आणखी एकाने जीव गमावला; आंदोलनस्थळी काळाचा घाला, कुटुंबांचा आक्रोश

    हिंगोली: मराठा आरक्षणाकरिता आणखी एकाचा बळी गेला असून ही घटना हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेल्या सिंदगी येथे घडली आहे. कळमनुरीत असलेल्या सिंदगी या गावी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आमरण उपोषण मागील दहा दिवसापासून सुरू केले आहे.
    लेकीच्या जन्माचं अनोखं स्वागत, मराठा आंदोलनावेळी जन्म, राजेगोरे दाम्पत्यानं नाव ठेवलं ‘आरक्षणा’ कारण…
    मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्यानंतर येथील गावकऱ्यांनी साखळी उपोषण अवलंबले होते. आज सकाळपासून प्रकाश नामदेव मगर (५४) हे देखील उपोषण स्थळी उपोषण करत होते. त्यांना उपोषण सुरू असताना अचानक भोवळ आली होती. त्यांना तातडीने जवळच असलेल्या पोत्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दरम्यान त्यांची प्रकृती अधिकच गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर अस्वस्थ आणि गंभीर असलेल्या परिस्थितीत त्यांना हिंगोली येथे उपचारासाठी तात्काळ पाठवले.

    आम्हाला आजारी पडायचा पण अधिकार नाही का? आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी, अधिकारी आक्रमक

    हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. एकंदरीत मराठा आरक्षणासाठी आणखी एक उपोषणात सहभागी असलेल्या मराठा बांधवांचा बळी गेला आहे. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली असून त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर तसेच गावावर परिसरावर दुःख पसरले. या घटनेमुळे संपूर्ण मराठा समाज हळहळ व्यक्त करत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed