• Sat. Sep 21st, 2024
मित्रांचा धाडसी प्रयोग! काळाच्या ओघात हरवलेली मातीची भांडी बनवली; अन् मिळवला लाखोंचा नफा

सिंधुदुर्ग: पूर्वीच्या काळी लोक स्वयंपाक तसेच जेवण वाढण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर करायचे. परंतु काळाच्या ओघात ही परंपरा कुठेतरी हरवत चाललेली आहे. स्वयंपाकघरात ठेवलेल्या मातीच्या भांड्याची जागा आज स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांनी घेतली आहे. मात्र सिंधुदुर्गातील ज्ञानेश चिंदरकर आणि सदानंद हिदळेकर या दोघांनी कुंभार माती हस्तकलेचा व्यवसाय सुरू केला.
मध्य प्रदेशातून कत्तलीसाठी गुप्त मार्गाने बैल महाराष्ट्रात; पोलिसांना कुणकुण, सापळा रचला, अन्…
सुरुवातीला कुंभार समाजाच्या संघटनेच्या माध्यमातून कुंभार माती हस्तकला व्यवसाय सुचत गेला. त्यानंतर आम्ही वेगवेगळे प्रयोग करू लागतो. नव्याने सुरुवात होत असताना चाकांच प्रशिक्षण घेतलं. पूर्ण प्रशिक्षण घेतल्यानंतर जिगर जॉली अत्याधुनिक मशीनची माहिती मिळाली. ती मशीन आणून वेगवेगळे अजून मातीची भांडी बनवायला लागलो. हा प्रयोग करत दुसऱ्या वर्षांमध्ये पदार्पण करत असताना हा व्यवसाय समाधानकारक असल्याचे आम्हाला कळलं आणि लोकांची मागणी सुद्धा वाढू लागली.

ही माती हस्तकला करण्यासाठी काही वेळा कर्नाटक या राज्यातून आणावी लागते. कर्नाटक राज्यातील माहिती अत्यंत उपयोगी असते. मातीची भांडी मजबूत राहतात. तर काही माती लोकल ठिकाणी उपलब्ध होते. या मातीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. मातीचे भांडे, हंडा, कुल्डर आणि आकर्षक वाटणाऱ्या जग, पेला, वाट्या, झुबर, पणत्या जशा ग्राहकांना आकर्षित करतील तशा प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात. या मातीच्या भांड्याना महाराष्ट्रात मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे गोवा राज्यातही मोठी मागणी आहे. आमचं दुकान रोडला लागून असल्यामुळे तिथून पर्यटक देखील घेऊन जातात.

जालन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे वितरण, युवकांनी समाधान व्यक्त करत मानले शासनाचे आभार!

जी मातीची भांडी बनतात त्याबद्दल ग्राहकही समाधानी आहे. ही भांडी आमच्याच भट्टीमध्ये भाजून चांगल्या प्रकारे घेतो. त्यानंतर मातीची भांडी मार्केटमध्ये पाठवतो. यातून इतर खर्च वजा करता आम्हाला समाधानकारक नफा मिळतोय. या माती हस्तकलेतून आम्हाला खूप समाधान मिळत आहे. या मातीच्या भांड्यांना बाजारात मोठी मागणी आहे. पण आम्ही तेवढा पुरवठा करू शकत नाही. कुशल कामगार नाहीत किंवा कामगार तयार होतील पण त्यांची मानसिकता नाही आहे. एक लाख पेक्षा जास्त नफा मिळतो. त्यातून कोणतही नुकसान नाही. काही भांडी भट्टीमध्ये फुटतात पण तो आमचा तोटा नाही तर त्यातून आम्हाला अनुभव मिळतोय. त्यातून चांगली प्रगती, सुधारणा करण्याची संधी मिळते, असे चिंदरकर सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed