• Mon. Nov 25th, 2024

    दहा हजार कोटींची बिले थकली, दोन लाखावर छोटे कंत्राटदार कात्रीत, दिवाळी कशी साजरी करायची?

    दहा हजार कोटींची बिले थकली, दोन लाखावर छोटे कंत्राटदार कात्रीत, दिवाळी कशी साजरी करायची?

    कोल्हापूर : रस्ते, इमारत, पूल बांधणी, दुरूस्ती यासह विविध सरकारी कामांची तब्बल दहा हजार कोटींची बिले न मिळाल्याने राज्यातील दोन लाखांवर छोटे कंत्राटदार हवालदिल झाले आहे. एकीकडे सरकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दिवाळी भेटीची होणारी प्रेमळ मागणी आणि दुसरीकडे बिलेच न मिळाल्याने होत असलेली आर्थिक कोंडी यामुळे दिवाळी साजरी कशी करायची या कात्रीत हे कंत्राटदार अडकले आहेत.

    लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज्यात विकासकामांना आणि मंजूरींना वेग आला आहे. पण, दुसरीकडे झालेल्या कामांची बिले देण्यात राज्य सरकारकडून टाळाटाळ सुरू आहे. त्यांना वर्षातून मार्च व दिवाळी मध्येच त्यांनी केलेल्या कामांच्या बिलापोटी निधी सरकारकडून प्राप्त होतो. दिवाळी चार दिवसावर आली असतानाही हा निधी मिळाला नाही.

    चौथ्या विजयानंतर पाकिस्तानचा संघ सेमी फायनलमध्ये पोहोचणार का, जाणून घ्या संपूर्ण समीकरण…
    सध्या दहा हजार कोटींची बिले प्रलंबित आहेत. ती दिवाळीपूर्वी मिळावीत म्हणून गेले महिनाभर कंत्राटदार हेलपाटे मारत आहेत. मंत्र्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या भेटीगाठी घेत आहेत. मात्र, अजूनही बिले देण्यासाठी निधी प्राप्त झाला नाही. यामुळे दिवाळीपूर्वी ती मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. एकीकडे ही अवस्था असताना दिवाळी भेट मिळावी म्हणून अधिकारी- कर्मचाऱ्यांचा आग्रह मात्र वाढत आहे. बडे कंत्राटदारांची बिले वेळेत दिली जात असताना छोट्यांवर होत असलेल्या या अन्यायामुळे त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे.

    दिवाळीपूर्वी ही बिले मिळावीत म्ह्णून कंत्राटदार महासंघाच्या वतीने दोन महिने प्रयत्न सुरू आहेत. पण, सरकार दखल घ्यायला तयार नाही. आठ दिवसात ती न मिळाल्यास सर्व विकासकामे बंद करून आंदोलन करण्यात येईल.

    मिलींद भोसले, अध्यक्ष, राज्य कंत्राटदार महासंघ

    प्रलंबित बिले

    इमारत बांधकाम, दुरूस्ती : १७०० कोटी

    नवीन रस्ते व दुरूस्ती : ६५०० कोटी

    पूल दुरूस्ती, खड्डे भरणे : १८०० कोटी

    गावठाण व ग्रामीण रस्ते : ७८० कोटी

    कामांना मंजूरी : ४० हजार कोटी

    निधीची तरतूद : ४ हजार कोटी

    छोटे कंत्राटदार : २ लाख
    Semi-Final: वर्ल्डकप २०२३ची मोठी बातमी; मॅच न खेळता हा संघ पोहोचला सेमीफायनलमध्ये, विजय पाकिस्तानचा फायदा पाहा कोणाला?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *