• Sat. Sep 21st, 2024

पुणेकरांची मेट्रोकडे पाठ; ऑक्टोबर महिन्यात प्रवासीसंख्या ४ लाखांनी घटली; काय कारण?

पुणेकरांची मेट्रोकडे पाठ; ऑक्टोबर महिन्यात प्रवासीसंख्या ४ लाखांनी घटली; काय कारण?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे मेट्रो सेवेचा विस्तार होऊन बुधवारी (१ नोव्हेंबर) तीन महिने पूर्ण झाले असून, पहिल्या दोन महिन्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर तिसऱ्या महिन्यात मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दर महिन्याला मेट्रोला २० लाखांच्या पुढे प्रवासी मिळाले असताना ऑक्टोबरमध्ये त्यात चार लाखांची घट झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) प्रवासी संख्या टिकविण्यासाठी अधिक स्टेशनवर पूरक सेवा आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी.

ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विस्तारित मार्गांचे उद्घाटन केल्यानंतर सुरुवातीला उत्सुकता म्हणून आणि सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवामुळे रात्री उशिरापर्यंत मेट्रो सेवा सुरू होती. त्याचा फायदा प्रवाशांना झाला आणि मेट्रोतून अनेक पुणे व पिंपरी-चिंचवडकरांनी प्रवास केला. ऑक्टोबरमध्ये प्रवासी संख्येत मोठी घट झाली असून, मेट्रोला मिळणाऱ्या उत्पन्नात घसरण झाली आहे.

तीन स्टेशनवर एकच एंट्री

— पुणे मेट्रोचे विस्तारित मार्ग सुरू होऊन आता तीन महिने झाले, तरीही वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक मार्गावरील स्टेशनच्या ‘एंट्री-एक्झिट’ची कामे पूर्ण झालेली नाहीत.
— छत्रपती संभाजी उद्यान, डेक्कन जिमखाना आणि पुणे महापालिका मेट्रो स्टेशनसाठी अद्यापही केवळ एकच प्रवेशद्वार प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे.
— मेट्रोच्या उद्घाटनापासून उर्वरित ठिकाणांहून प्रवेश देण्यासाठी मेट्रोची कामे सुरू असून ती पूर्ण कधी होणार, याची ‘डेडलाइन’ अद्याप ‘महामेट्रो’कडून सांगितली जात नाही.
— छत्रपती संभाजी उद्यान आणि डेक्कन जिमखाना ही स्टेशन अनुक्रमे शनिवार आणि नारायण पेठेला जोडण्यासाठीच्या पादचारी पुलांचे काम अजून अपूर्णच आहे.

पुढचा विस्तार डिसेंबरमध्ये?

— रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यान मेट्रोने गेल्या महिन्यात यशस्वी चाचणी घेतली.
— या मार्गावरील येरवडा स्टेशनचे काम स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे बंद झाले आहे.
— कल्याणीनगर आणि रामवाडी या स्टेशनची कामे अंतिम टप्प्यात आहेत.
— ‘महामेट्रो’ने डिसेंबरमध्ये सेवा सुरू होईल, असा दावा केला असला, तरी पुढील कामे वेगाने पूर्ण होणार का?

आम्ही दररोज मेट्रोने पुणे स्टेशन येथून छत्रपती संभाजी उद्यान स्टेशन असा प्रवास करतो. मेट्रोचा प्रवास खूपच चांगला आहे. पूर्वी पुणे स्टेशन येथून मनपापर्यंत पीएमपी बसने येत होते; पण आता मेट्रो सुरू झाल्यानंतर मेट्रोने प्रवास करीत आहोत.-मोहित थोरात, रोहन क्षीरसागर (विद्यार्थी)

वनाझ येथून मॉडर्न कॉलेजला मी दररोज मेट्रोने येतो. छत्रपती संभाजी उद्यान स्टेशन येथे उतरून कॉलेजला जाते. मेट्रोचा प्रवास खूप चांगला आहे. वाहतूक कोंडी किंवा आवाजाचा देखील त्रास नाही.-सायली म्हात्रे (विद्यार्थिनी)

खालील सर्व चौकटींचे ग्राफिक करावे
डिजिटल तिकिटाला प्रतिसाद
महिना… ऑनलाइन तिकीटाचे पैसे … टक्केवारी

ऑगस्ट… १,५९,०७,५६१… ५१.७५
सप्टेंबर… १,६१,४८,४९८… ५५.४१
ऑक्टोबर… १,४३,३६,८९२ … ६२.२२

तीन महिन्यांतील प्रवासी संख्या व उत्पन्न
महिना….. प्रवासी संख्या उत्पन्न (रुपयांत)

ऑगस्ट २०,४७,००१ ३,०७,३९,७१०
सप्टेंबर २०,२३,२३९ २,९८,७७,२५६
ऑक्टोबर १६,७२,६०६ २,४८,१३,५९८

वनाझ ते रुबी हॉलवरील प्रवासी संख्या व उत्पन्न
महिना… प्रवासी संख्या… उत्पन्न

ऑगस्ट ११,५९,२४१ १,६४,३४,८९३
सप्टेंबर ११,७६,५९९ १,६७,८४,३९५
ऑक्टोबर ९,८६,८७५ १,४१,५०,६८६
नाशिककरांची हक्काची पुणे-नाशिक एक्स्प्रेस ‘पळविली’; हुतात्मा एक्स्प्रेसचा बदलला रुट, कोणत्या मार्गे धावणार?
सिव्हिल कोर्ट ते पिंपरी-चिंचवड प्रवासी संख्या व उत्पन्न
महिना… प्रवासी संख्या… उत्पन्न
ऑगस्ट ८,८७,७६० १,४३,०४,८१७
सप्टेंबर ८,४६,६९१ १,३०,९२,८६१
ऑक्टोबर ६,८५,७७१ १,०७,०२,९१२

तुम्हाला काय वाटते?

पुण्याच्या मेट्रोतून तुम्ही प्रवास केलात का? प्रवासी वाढविण्यासाठी मेट्रोने काय करायला हवे, असे तुम्हांला वाटते? मेट्रोकडून आणखी कोणत्या सुविधा मिळायला हव्या, अशी तुमची अपेक्षा आहे? यासह मेट्रो संदर्भातील तुमची मते आम्हांला [email protected] वर जरूर कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed