मुंबई : घराघरात, मनामनांत मराठी व्यंजन संस्कृती पोहोचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समुहाचे धडाडीचे वारसदार अर्थात व्ही पी बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लोणची, मसाले, चटणी या पारंपरिक मराठमोळ्या खाद्यपदार्थांना जगभरात प्रतिष्ठा देण्यात बेडेकरांचा मोठा वाटा आहे.
१९१० मध्ये विश्वनाथ परशुराम बेडेकर यांनी गिरगावात लोणची-मसाल्यांचं दुकान सुरु केलं होतं. खप वाढल्यानंतर दुकानाच्या शाखांचा विस्तार झाला. दादर, फोर्टमध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची अल्पावधीतच पाच दुकानं झाली. १९४३ मध्ये ‘व्ही. पी. बेडेकर अँड सन्स लिमिटेड’ असं कंपनीचं नामकरण करण्यात आलं.

शतकोत्तर वाटचालीचा बेडेकर परिवार उद्योग समुहाने मानदंड निर्माण केला आहे. त्यांनी देश आणि विदेशात मसाले, लोणचे, पापड यांच्या माध्यमातून घराघरात स्थान निर्माण केले आहे. या उद्योग समुहाच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व अतुल बेडेकर करत होते. आपल्या धडाडीने त्यांनी या उद्योग समुहात काळानुरुप बदल घडवून घोडदौड चालू ठेवली होती.
अतुल बेडेकर यांच्या निधनामुळे जुन्या – नव्या पिढ्यांचा मार्गदर्शक दुवा निखळला आहे. त्यांच्या अकाली निधनाने झालेला आघात सहन करण्याची बेडेकर परिवाराला शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतुल बेडेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News