• Mon. Nov 25th, 2024

    राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत राजभवन येथे छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Nov 2, 2023
    राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत राजभवन येथे छत्तीसगढ, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा – महासंवाद

    मुंबई, दि. 2 : ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून बुधवारी (दि. 1) राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्तीसगढमध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

    यावेळी छत्तीसगड येथील चित्रोत्पला लोककला परिषद तसेच आंध्र प्रदेशातील तेलुगू कला समिती यांच्यावतीने तिन्ही राज्यांच्या लोककला व संस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. 

    यावेळी बोलताना राज्यपाल श्री. बैस म्हणाले कीआद्य शंकराचार्यांनी संपूर्ण देशाला समान संस्कृतीच्या धाग्याने जोडण्याच्या उद्देशाने देशाच्या वेगवेगळ्या दिशांना चार मठांची स्थापना केली. धर्माचे अधिष्ठान दिल्यास नागरिक एका भागातून दुसऱ्या भागात पर्यटनाला जातील व त्यातून नव्या संस्कृतीची ओळख होईलया उद्देशाने त्यांनी पीठांची स्थापना केलीअसे नमूद करुन एक भारत श्रेष्ठ भारत‘ या उपक्रमातून प्रत्येक राज्याने इतर राज्याची संस्कृती जाणून घ्यावीया हेतूने सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

    देशभरातील सर्व राजभवनांमध्ये 1 नोव्हेंबरला या एकाच दिवशी 8 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांचे स्थापना दिन साजरे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.  महाराष्ट्र राजभवन येथे हरियाणाकर्नाटककेरळपंजाब व तामिळनाडू तसेच पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस देखील बुधवारी (दि. 1) दुपारी साजरा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

    छत्तीसगड राज्य स्थापनेसाठी आपण स्वतःआग्रही होतो. तत्कालिन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात काम करीत असतानाच त्यांनी छत्तीसगड राज्य स्थापनेची घोषणा केलीयाचे स्मरण देऊन महाराष्ट्राचा राज्यपाल या नात्याने राजभवनात छत्तीसगड स्थापना दिवस साजरा करणे आपल्यासाठी सुखद अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले.

    उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल कलाकारांचे अभिनंदन करताना संगीत आणि नृत्य हे भाषाजात तसेच धर्माच्या सीमा ओलांडून थेट हृदयाला स्पर्श करतात, असे राज्यपालांनी सांगितले.

    राज्यपाल श्री.बैस यांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ तेलुगू अभिनेते सुमन तलवारचित्रोत्पला लोक कला परिषदेचे संचालक राकेश तिवारीतेलुगू कला समितीचे एम.के. रेड्डी आणि कुचीपुडी नृत्यांगना नादिया यांचा सत्कार करण्यात आला.

    यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रनागपूर यांच्या माध्यमातून चित्रोत्पला लोककला परिषदेच्या वतीने छत्तीसगढ गीतजंवारा गीतकरमा नृत्यनाचा गीत नृत्यफाग गीत नृत्य व मध्य प्रदेशातील कलाकारांचे कबीर गायन (माळवा शैली) सादर करण्यात आले. तेलुगू कला समितीच्या माध्यमातून नृत्यांगना नादिया यांनी कुचीपुडी नृत्य सादर केले.  

    कार्यक्रमाला राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेनाराज्यपालांच्या प्रभारी सचिव श्वेता सिंघल व परिवार प्रबंधक अरुण आनंदकर तसेच छत्तीसगढमध्यप्रदेश व आंध्रप्रदेश येथील कलाकार व निमंत्रित उपस्थित होते.   

    ०००

    State Formation Day of Chhattisgarh, MP and Andhra Pradesh celebrated in

    Maha Raj Bhavan

    Mumbai 2 : The State Formation day of Chhattisgarh, Madhya Pradesh and Andhra Pradesh was celebrated in Maharashtra Raj Bhavan in the presence of State Governor Ramesh Bais on Wed (1 Nov).

     A cultural programme comprising folk songs and dance from Chhattisgarh, Madhya Pradesh and Andhra Pradesh was presented to mark the event.

    Speaking on the occasion, Governor Ramesh Bais said the States of India formed a beautiful bouquet decorated with flowers of different colours. The Governor said Adi Guru Shankaracharya established four Mathas in different corners of the country with a view to weaving the country in a thread of common culture.  He said the idea behind setting up the peethas was to encourage people to travel to different parts of the country and learn more about the region’s customs and traditions.

    He said thanks to the ‘Ek Bharat Shreshtha Bharat’ initiative, Raj Bhavans across the country were celebrating the State Formation Day of 8 States and 5 union territories on a single day of 1st November. He informed that Maharashtra Raj Bhavan had celebrated the State Formation Day of Haryana, Karnataka, Kerala, Punjab and Tamil Nadu alongwith that of 5 Union Territories earlier in the day on 1 Nov.

    The Governor said music and dance transcend the borders of language, caste or religion and touch the core of one’s heart. In this connection he applauded all the performing artists for their excellent presentation.

    The Governor felicitated Telugu film star Suman Talwar, Director of Chitrotpala Lok Kala Parishad Chhattisgarh Rakesh Tiwari, M K Reddy of Telugu Kala Samiti and Kuchipudi dancer Nadiya.

    The cultural programme comprising of Chhattisgarh Geet, Janwara Geet, Karma Dance, Nacha Geet Dance, Fag Geet was presented by members of the Chitrotpala Lok Kala Parishad, while and artists from Madhya Pradesh presented the Kabir Gayan (Malwa style). The Kuchipudi Dance was performed by Nadiya on behalf of Telugu Kala Samiti.

    The programme was organised by Maharashtra Raj Bhavan in association with the South Central Zone Cultural Centre, Nagpur, Chitrotpala Lok Kala Parishad Chhattisgarh and Telugu Kala Samiti.

    Special Secretary to the Governor Vipin Kumar Saxena, Secretary to the Governor (In Charge) Shweta Singhal, Comptroller of the Governor’s Households Arun Anandkar, artists and invitees from Chhattisgarh, Madhya Pradesh and Andhra Pradesh were present.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *