• Sat. Sep 21st, 2024

दिवाळीत कामगारांना मिळाली खूशखबर; अंबड MIDCतील १२ कारखान्यांत बोनस जाहीर

दिवाळीत कामगारांना मिळाली खूशखबर; अंबड MIDCतील १२ कारखान्यांत बोनस जाहीर

म. टा. वृत्तसेवा, सातपूर : अंबड औद्योगिक वसाहतीत कामगारांसाठी यंदा खूशखबर मिळाली आहे. सीटू संलग्न १२ कारखान्यांमध्ये दिवाळीचा बोनस नुकताच जाहीर झाल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सरासरी २० ते ७५ हजार रुपयांपर्यंत बोनस कामगारांना मिळणार असल्याचे सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले.

या कारखान्यांत २० टक्के किंवा महिन्याचा पगार बोनस म्हणून जाहीर करण्यात आला आहे. यात नोव्हाटिअर, अॅडम फॅब्रिवर्क, फिनोटेक्स फायबरकास्ट, अल्फ इंजिनीअरिंग, आर्ट रबर इंडस्ट्रीज, ब्लू क्रॉस लॅबोरॅटरिज, ल्युसी इलेक्ट्रीकल इंडिया, नाशिक ऑटोटेक, ग्लोबटेक मेटलक्राप्ट, तुषार इंडस्ट्रीज व तुषार प्रिसिजन, सुमो ऑटोटेक, रिलाएबल ऑटोटेक या कारखान्यांचा समावेश आहे. बोनस जाहीर झाल्याने कामगारांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या बोनस करारासाठी सीटूचे सीताराम ठोंबरे, देविदास आडोळे, संतोष काकडे, तुकाराम सोनजे, सतीश खैरनार, आत्माराम डावरे, अरविंद शहापुरे, संदीप कातोरे आणि संबंधित कंपनीमधील व्यवस्थापक व समिती सदस्य उपस्थित होते.

कोणत्या कारखान्यात किती बोनस?

नोव्हाटिअर इलेक्ट्रीकल अँड डिजिटल सिस्टीम लि. (लिग्रांड) : ६५,००० ते ७५,००० रुपये
अॅडम फॅब्रिवर्क लि. : २० टक्क्यांप्रमाणे ५७००० रुपये
फिनोटेक्स फायबरकास्ट लि. : २० टक्क्यांप्रमाणे ५०,००० रुपये
अल्फ इंजिनीअरिंग प्रा. लि. : २१००० ते ४१००० रुपये
आर्ट रबर इंडस्ट्रीज लिमिटेड : २० टक्क्यांप्रमाणे २६००० रुपये
ब्लू क्रॉस लॅबोरॅटरिज प्रा. लि. : २० टक्क्यांप्रमाणे ३५००० रुपये
ल्युसी इलेक्ट्रीकल इंडिया प्रा. लि. : ३५००० रुपये
पैठणमध्ये DRIची मोठी कारवाई; १६० कोटींचे अमली पदार्थ जप्त, दोघांना अटक
नाशिक ऑटोटेक प्रा. लि. : २० टक्के
ग्लोबटेक मेटलक्राप्ट प्रा. लि. : महिन्याचा पगार
तुषार इंडस्ट्रीज व तुषार प्रिसिजन : ३६ दिवसांचा पगार
सुमो ऑटोटेक प्रा. लि. : १६,५०० रुपये
रिलाएबल ऑटोटेक प्रा. लि. : २० टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed