नवले पुलावर जाळपोळ केल्याप्रकरणी रवी पडवळ, प्रशांत पवार, निखिल पानसरे, योगेश दसवडकर, उमेश महाडिक, संतोष साठे, निखिल धुमाळ, समीर घाटे, अभिषेक भरम, विराज सोले यांच्यासह ४०० ते ५०० आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार नितीन खुटवड यांनी या संदर्भात सिंहगड रस्ता पाेलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडून मंगळवारी (३१ ऑक्टोबर) दुपारी बाराच्या सुमारास वडगाव बुद्रुक परिसरातील नवले पुलाजवळ आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनात ४०० ते ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर आंदोलकांनी टायर पेटविल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दि. ३१ रोजी दुपारी 12: 15 ते 2 वाजता दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 मुंबई बेंगलोर वर मुंबईकडून सातारा कडे जाणारी लेन टूर्स अँड ट्रॅव्हल्स ऑफिस समोर व साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर विश्वास हॉटेलच्या समोर वडगाव बुद्रुक पुणे येथे मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा व सखल मराठा मोर्चा कार्यकर्ते यांनी रस्ता रोकत आंदोलन केले होते. त्यामुळे त्या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या चालकांना मनस्ताप सहन करावा लागला. तसेच रास्ता रोकत कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकणी IPC – 143 ,147 ,188,341,336, महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37(1)(3) 135 सह क्रिमिनल अमेंडमेंट लाॅ ऍक्ट 07 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रास्ता रोको प्रकरणानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने खेड-शिवापूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात जमावबंदीचा आदेश लागू असताना उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News