मिळालेल्या माहितीनुसार, औंध पोलिसांना वरुड (ता. खटाव) येथे गांजाची विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने औंध पोलीस ठाण्यातील पोलिसांनी वेशांतर करून वरुड येथील साळुंखे वस्ती येथे पाहणी केली असता त्यांना गांजाची रोपे आढळून आली.
या रोपांची खात्री करून खटावच्या तहसीलदार बाई माने, औंध कृषी पर्यवेक्षक शिंदे , पंचायत समिती कर्मचारी, वरुड गावचे पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करून साळुंखे वस्तीमधील ईश्वर दत्तात्रेय जगदाळे यांच्या गुरांच्या गोठ्याजवळ सुमारे दोन लाख चार हजार पाचशे रुपये किमतीचा गांजाची झाडे व मुद्देमाल जप्त ताब्यात घेण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सूचनेनुसार अश्विनी शेडगे, उपविभागीय अधिकारी दहिवडी विभाग अश्विनी शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर, सहायक पोलिस निरीक्षक व गंगाप्रसाद केंद्रे , पी. एस. पाटोळे, डी. वाय. देवकुळे, आर. एस. बनसोडे, एम. आर. जाधव यांनी कारवाई केली.