मात्र आज मुख्याधिकारी यांनी पुन्हा डुक्कर पकडण्यात यावे, असे सांगितल्यामुळे आज संबंधित ठेकेदार आणि त्यांचे ११ साथीदारांसह आरोग्य निरीक्षक पारवे व संबंधित पोलीस यांनी कारवाई सुरू करून अडीच ते तीन डुक्करांना पकडले. त्यानंतर दोन व्हॅनमध्ये भरण्यात आले होते. मात्र त्यानंतर डुक्कर मालक आपल्या कुटुंबासह लहान मुलं बाळ घेऊन नगरपरिषद मुख्यालयाच्या गेटवर येऊन धडकले. गाड्या जाऊ देणार नाही असे सांगू लागले. आमचा डुक्कर आम्हाला वापस द्या. त्याच्या बदलात मजुरी गाडी भाडं सर्व काही घ्या, असे म्हणून आरडाओरड करायला लागले. परिस्थिती पाहता पाहता नगरपरिषदेसमोर एकच गोंधळ निर्माण झाला.
संबंधित अधिकारी यांच्याकडे मुख्याधिकारी नांदगाव खंडेश्वर यांचा पण चार्ज असल्याने ते गेल्या दोन दिवसांपासून दर्यापुरात नव्हते. आज सुद्धा कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंग असल्याचे सांगून ते येऊ शकले नाही. त्यामुळे संबंधित आदिवासी पारधी समाजाच्या लोकांनी एकच गोंधळ निर्माण केला. पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी पाचरण करण्यात आले. हा गोंधळ दोन तास नगरपरिषद समोर सुरू होता. संबंधित अधिकाऱ्याने आम्हाला दोन लाख रुपये वर्षाला द्या, तेव्हा आम्ही तुमचे डुकरे तुमच्या घरात राहू देऊ असा आरोप संबंधित महिलांनी केला होता.
मात्र त्या संदर्भात आरोग्य निरीक्षक यांना विचारले असता त्यांनी त्यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करून मी माझी ड्युटी बजावतो. मला माझ्या साहेबांनी जे सांगितले ते काम करतो असे सांगितले. साहेबांचा निर्णय जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या कुटुंबासह नगरपरिषद परिसरातच बसणार आहोत, असे संबंधित डुक्कर मालकांनी सांगितले. वृत्त येईपर्यंत यामध्ये कुठलाही तोडगा निघाला नव्हता. गाड्या मात्र डुकरांसह नगरपरिषदेत जमा करण्यात आल्या होत्या. पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात होता.