धाराशिव: बलात्कार प्रकरणातील आरोपी विठ्ठल मदने याच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून ठार मारल्याची घटना परंडा तालुक्यातील ढगपिपरी येथे सोमवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजच्या सुमारास घडली आहे. जखमी विठ्ठल मदने यास परंडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरानी मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल मदने याने १० वर्षांपुर्वी सोन्या चौधरी यांच्या बहिणीला पळवून नेले होते. या प्रकरणी विठ्ठल मदने विरूद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर विठ्ठल मदने हा पुणे जिल्ह्यातील राहू पिंपळगाव येथे राहत होता. विठ्ठल मदने याच्यावर १० वर्षांपुर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याची तारीख ३१ ऑक्टोबर रोजी परंडा न्यायालत होती. या तारखेसाठी विठ्ठल मदने हा ढगपिपरी गावात आला होता. मागील १० वर्षांपुर्वीचा राग मनात धरून सोन्या भगवान चौधरी याने दि, ३० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास विठ्ठल मदने याच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याला ठार मारले आहे.

या प्रकरणी मयताचा भाऊ अनंता मदने यांच्या फिर्यादीवरून सोन्या चौधरीविरूध्द काल रात्री परंडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शानाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक सुर्वे, पोलीस नाईक विशाल खोसे यांनी आरोपी सोन्या चौधरी यास ३ तासांच्या आत ढगपिपरी शिवारातून अटक केली आहे. दि ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ मृतदेहाचे उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुर्वे हे करत आहेत. मयत विठ्ठल मदने याच्यावर टेंभुर्णी पोलिसात अत्याचार प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये मदने याने शिक्षा भोगली आहे.