याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने रुग्णाला घेऊन रुग्णवाहिका निघाली होती. त्या रुग्ण वाहिकेत त्या रुग्ण महिलेसह तिचा नातेवाईक आणि चालक होता. मात्र, माहामर्गावरच ती रुग्णवाहिका बंद पडल्याने सर्वजण त्या रुग्ण वाहिकेतून खाली उतरले होते.
सर्व जण खाली उतरल्यानंतर रुग्ण वाहिकेला काही वेळात आग लागली. त्यानंतर तिचा मोठा ब्लास्ट झाला. मात्र त्या रुग्णवाहिकेत लाइफ सपोर्टवर असलेल्या पेंशट महिलेचा लाईफ सपोर्ट मिळणं बंद झाल्यानं तिचा मृत्यू झाला. नीलवा गवलदार असं त्या मृत महिलेचं नाव आहे. या स्फोटात पोलीस कर्मचाऱ्यांची दुचाकी आणि रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रुग्ण वाहिलेला लागलेली आग विझविली आहे. या स्फोटामुळे रुग्णवाहिकेचे सर्व स्पेअरपार्ट रस्त्यावर पडले होते. काही वेळ या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली होती. जेसीबीच्या मदतीने ही जळालेली रुग्णवाहिका बाजूला करण्यात आली. मात्र या स्फोटामुळे आजूबाजूला राहणारे सर्व नागरिक आवाजाने येथे जमा झाले होते. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू असून मात्र मोठी दुर्घटना टाळली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News