• Sat. Sep 21st, 2024

Latur News: हिंदू लिंगायतांचा आरक्षणासाठी मोर्चा; शिवा संघटनेने केले नेतृत्व

Latur News: हिंदू लिंगायतांचा आरक्षणासाठी मोर्चा; शिवा संघटनेने केले नेतृत्व

म. टा. प्रतिनिधी, लातूर : हिंदू लिंगायत समाजातील ३२ पोटजातींना ओबीसी, एसबीसी व एनटी आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत शिवा संघटनेच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.

संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रांतसदस्य दत्ताभाऊ खंकरे यांच्या संयोजनात सोमवार गंजगोलाईजवळील महादेव मंदिरापासून ते जुने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातून हजारो लिंगायत बांधव सहभागी झाले होते. हा मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला. त्यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

हिंदू लिंगायत समाजातील ३२ पोटजातींना ओबीसी, एसबीसी व एनटी आरक्षण मिळावे, राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची संजीवन समाधी असलेल्या श्री क्षेत्र भक्तिस्थळ अहमदपूरच्या विकासासाठी २५ कोटी, श्री क्षेत्र कपिलधार रस्त्याचा विकास, मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक तातडीने उभारावे आदी मागण्या या वेळी करण्यात आला.

‘सरकारने लिंगायत समाजाला आरक्षण देण्यासह इतर मागण्यांची तातडीने दखल घ्यावी आणि मागण्या मान्य कराव्यात,’ असे प्रा. मनोहर धोंडे म्हणाले. ‘मागण्या मान्य होईलपर्यंत शिवा वीरशैव संघटना लढा लढत राहणार आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास लढा तीव्र करू,’ असा इशारा दत्ताभाऊ खंकरे यांनी दिला.
६९ टक्क्यांपर्यंत आरक्षण शक्य, फक्त राजकीय इच्छाशक्ती हवी; कपिल पाटलांचं एकनाथ शिंदेंना पत्र
या धडक मोर्चात उमाकांतप्पा शेटे, आचार्य गुरुराज स्वामी, शिवशरण बिराजदार, प्रेरणा होनराव, भगवंतराव चांभरगेकर, चंद्रकांत वैजापुरे, बसवराज पाटील कौळखेडकर, सुभाषअप्पा मुक्ता, सिद्धेश्‍वर पाटील, अण्णासाहेब पाटील, शिवानंद हेंगणे, ओम पुणे, विठ्ठल ताकबिडे, वैजनाथ तोनसुरे, संजय कोठाळे, सातलिंग स्वामी, लक्ष्मण विभुते, कल्पना बावगे, भीमाशंकर लखादिवे, पद्मिनबाई खराडे, विलास खिंडे, अंतेश्‍वर तोडकरी आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed