• Mon. Nov 25th, 2024

    हिरे व्यवसाय गुजरातच्या वाटेवर, १६ हजार कोटींच्या ‘डायमण्ड बोर्स’ला लालफितीच्या कारभाराचा फटका

    हिरे व्यवसाय गुजरातच्या वाटेवर, १६ हजार कोटींच्या ‘डायमण्ड बोर्स’ला लालफितीच्या कारभाराचा फटका

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: देशभरातील सोने-चांदीचे केंद्र असलेल्या मुंबईत मागील काही वर्षांत हिरे व्यवसायदेखील उदयास आला होता. मात्र, लालफितीच्या कारभारात मंजुरीच्या विलंबामुळे मुंबईतील हा १६ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय सुरतला निघाला आहे.

    देशाची आर्थिक राजधानी असल्याने व त्याचवेळी समुद्राला लागून असल्याने विविध प्रकारच्या व्यवसायांचे प्रमुख निर्यात केंद्र अनेक वर्षांपासून मुंबईत आहे. त्यामध्येच हिरे व्यवसायाचाही समावेश आहे. त्यातूनच जेम्स अॅण्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने (जीजेईपीसी) वांद्रे-कुर्ला संकुलात ‘भारत डायमण्ड बोर्स’ सुरू केले असून, तेथे २,५०० व्यावसायिक हिऱ्यांच्या दागिन्यांचे काम करतात. पण, आता याच ‘जीजेईपीसी’ने गुजरातमध्ये ‘सुरत डायमण्ड बोर्स’ उभा केल्याने मुंबईतील व्यवसाय तिथे जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

    ‘झीरो’ गुन्हा नोंदवण्यास पोलिसांकडून टाळाटाळ, महानिरीक्षकांचे महत्त्वाचे आदेश, हद्दीचे कारण दिल्यास कारवाई
    याबाबत ‘मुंबई ज्वेलरी असोसिएश’चे उपाध्यक्ष व ‘इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलरी असोसिएशन’चे प्रवक्ते कुमारपाल जैन यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले की,’आज देशात हिऱ्यांची आयात ही सुरतला होते. तिथेच दागिने तयार होतात. काही दागिने मुंबईत तयार होतात. मात्र, त्यांची निर्यात करण्यासाठी विविध औपचारिकता व्यावसायिक, निर्यातदार व व्यापाऱ्यांना मुंबईत येऊन पूर्ण करावी लागते. हे दागिने मुंबईत आल्यानंतर विविध विभागांच्या परवानग्यांमध्ये वेळ जातो व त्यात विलंब होतो. सुरतला मात्र निर्यातीसह सर्व प्रकारचे सोपस्कार हे त्या जागीच पूर्ण होऊन तिथूनच निर्यात करणे शक्य होणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार असल्याने व्यावसायिक तिथे जाण्यासाठी सज्ज आहेत.’

    याबाबत काही व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता, त्यांनी प्रामुख्याने रिझर्व्ह बँक व सीमा शुल्क विभागाबाबत रोष व्यक्त केला. सुरतचे व्यावसायिक दागिने घेऊन मुंबईत आल्यानंतर त्यांना मुंबईतील स्थानिक दलालांना पैसे द्यावे लागतात. त्यानंतर निर्यातीसाठी सीमा शुल्क विभागाची मंजुरी घेणे, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयासंबंधी मंजुरी घेणे व अखेरीस रिझर्व्ह बँकेकडून निर्यात प्रमाणपत्र मिळवणे, यात अनेकदा दहा-दहा दिवसांचा कालावधी लागतो. सुरतला मात्र हे सर्व एकाच छताखाली होणार असल्यानेच व्यापारी तिकडे जाण्यास उत्सुक आहेत.

    पश्चिम रेल्वेवर मार्गिकेचे काम; मात्र प्रवाशांचे हाल, ट्रेन उशिराने धावत असल्याने स्थानकांवर गर्दी

    फरक असा

    बीकेसीतील ‘भारत डायमण्ड बोर्स’मध्ये नऊ टॉवर असून, एकूण २५०० कार्यालये, कारखाने, दागिने उत्पादक, निर्यातदार तेथे आहेत. सुरत डायमण्ड बोर्स हे मुंबईच्या दुप्पट मोठे आहे. तेथे प्रत्येकी १६ मजली एकूण नऊ टॉवर आहेत. त्यामध्ये जवळपास ४,४०० कार्यालये आहेत. सुरतच्या केंद्रामध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांची माहिती शेअर बाजाराप्रमाणे विशेष संगणकीकृत डिजिटल बोर्डावर २४ तास दाखवली जाणार असून, एकप्रकारे हिरे डिजिटल बाजार तेथे उभा होत आहे.

    दानशूर व्यक्तींनी द्यावं आणि गरजवंतांनं घ्यावं, मुंबईत उभी राहिली माणुसकीची भिंत

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed