• Sat. Sep 21st, 2024

वानखेडेत दिसणार क्रिकेटचा ‘देव’! ऐतिहासिक स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचे भव्य शिल्प, कधी होणार अनावरण?

वानखेडेत दिसणार क्रिकेटचा ‘देव’! ऐतिहासिक स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचे भव्य शिल्प, कधी होणार अनावरण?

नगर : क्रिकेटचा देव, भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे पूर्णाकृती शिल्प मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर बसविण्यात येत आहे. एक नोव्हेंबरला त्याचे अनावरण करण्यात येणार आहे. आपल्या कारकीर्दीत चौकार आणि षटकारांची आतषबाजी करणाऱ्या सचिनची षटकार मारतानाची गाजलेली एक पोझ यापुढे कायमस्वरूपी वानखेडे स्टेडिअममध्ये पहायला मिळणार आहे. नगरचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी ही २२ फुटी कलाकृती साकारली आहे. शिल्पासाठी जी पोझ निवडण्यात आली ती ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकीपटू शेन वॉन यांच्या चेंडूवर सचिनने षटकार मारतानाची असल्याचे सांगण्यात येते.

सचिनच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने सचिनचे शिल्प वानखेडे स्टेडियममध्ये उभारण्याची घोषणा केली होती. जगातील अनेक देशांमध्ये तेथील खेळाडूंचे पुतळे आहेत. आता भारतातही असे शिल्प साकारले आहे. कास्यांपासून (ब्रांझ) तयार करण्यात आलेल्या मुख्य मूर्तीची उंची १० फूट, हातातील बॅट ४ फूट असे चौदा फूट उंचीचे मूळ शिल्प आहे. त्याखाली जगाचे चिन्ह म्हणून क्रिकेटचा चेंडू साकारण्यात आला आहे. सचिन रमेश तेंडुलकर असे पूर्ण नाव त्यावर कोरण्यात आले आहे. चेंडूच्या पॅनलवर सचिनचे विविध विक्रम नमूद करण्यात आले आहेत. एकूण २२ फूट उंचीचे शिल्प झाले आहे. स्टेडिअममधील प्रेक्षागृहात हे शिल्प बसविण्यात येत असल्याने ते सतत सर्वांच्या नजरेस पडणार आहे.

या शिल्पाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितले, ‘हे काम मला मिळाले, हेच मुळी स्वप्नवत होते. माझ्याकडे अयोध्येतील राम मंदिरातील काम सुरू होते, तर दुसरीकडे क्रिकेटच्या देवाचे काम हाती आले होते. सचिन यांच्याशी माझे २०१२ पासून संबंध आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी पुन्हा भेटीचा योग आला. त्यांचे बंधू अजित तेंडुलकर यांची सचिनच्या मूर्तीतील बारकावे साकारण्यासाठी मोठी मदत झाली. नगरच्या स्टुडिओमध्ये सुमारे आठ महिने हे काम सुरू होते. अजित काम पाहण्यासाठी नगरला आले होते. शिल्प तयार करण्यापूर्वी ते कसे असावे? विशेष म्हणजे यासाठी कोणती पोझ घ्यावी, यावर बरीच चर्चा झाली. यासाठी जुनी छायाचित्रे पाहण्यात आली. त्यातील षटाकार मारतानाची एक पोझ निश्चित झाली. शिल्प साकारताना सचिनची नजर, हेल्मेटवरील लोगो यासह सर्व बारकाव्यांवर खूप मेहनत घेतली. यासाठीही अजित यांचे मोलाचे सहकार्य लाभले. काम सुरेख व्हावे, यासाठी क्ले आणि काही साहित्य जपानहून मागविण्यात आले,’ असेही कांबळे यांनी सांगितले.
Israel-Hamas War: इस्त्रायलच्या कारवाईत ‘हमास’चा म्होरक्या ठार, गाझा पट्टीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी कारवाई
आजवर अनेक कलाकृती साकारल्या. मात्र सचिनचा पुतळा साकारणे हे माझ्यासाठी स्वप्नवत होते. भारतरत्न वक्तीचे शिल्प साकारण्याची संधी नगरमधील माझ्यासारख्या कलाकाराला मिळाली, ही माझ्यासाठी सन्मानाचीच गोष्ट आहे.-प्रमोद कांबळे, चित्र-शिल्पकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed