• Mon. Nov 25th, 2024

    हॉटेलच्या मागे रंगली होती कोजागरीची रात्र, पोलिसांनी लपून छापा टाकताच पाहिलं धक्कादायक…

    हॉटेलच्या मागे रंगली होती कोजागरीची रात्र, पोलिसांनी लपून छापा टाकताच पाहिलं धक्कादायक…

    अहमदनगर : कोजागरी पौर्णिमेनिमित्त शनिवारी रात्री सर्वत्र नागरिक गाणी, गप्पा-गोष्टी आणि चंद्राच्या साक्षीने दूध पिण्याचा आनंद लुटत असताना नगरच्या कोठला भागात मात्र जुगाराचे डाव सुरू होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिथे छापा घालून २४ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सात लाख, ३६ हजार रुपयांची रोख रक्कम आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. कोठला येथील एका हॉटेलच्या पाठीमागील खोलीत जुगाराचे डाव सुरू होते. पकडले गेलेल्यांमध्ये विविध धर्मातील आणि वयोगटातील लोकांचा समावेश आहे. नगर शहरासह नजीकच्या ग्रामीण भागातूनही लोक तेथे जुगार खेळण्यासाठी आले होते.

    स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना यासंबंधीची माहिती मिळाली होती. त्यांनी आपल्या शाखेतील पथकांना कारवाईसाठी पाठविले. कोठला येथील हॉटेल कुरेशीच्या पाठीमागे असलेल्या बंदीस्त खोलीमध्ये वेगवेगळे तीन डाव सुरू होते. तेथे गोलाकार लोक तिरट नावाचा जुगार खेळत होते. पथकाची खात्री होताच अचानक छापा टाकला. पोलिस आल्याचे पाहून जुगार खेळणारे गडबडून गेले. यावेळी ७ लाख, ३६ हजार रुपये रोख, एक स्कॉर्पिओ गाडी, विविध प्रकारचे १९ मोबाईल फोन व जुगाराची साधने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    Kaali-Peeli Taxi : मुंबईकर ‘काली-पिली’ टॅक्सी Miss कराल, प्रवास संपणार; का घेतला हा निर्णय?
    पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, विजय ठोंबरे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष लोढे, सचिन आडबल, संदीप चव्हाण, रविंद्र घुंगासे, रणजीत जाधव, रोहित मिसाळ, जालिंदर माने, बाळासाहेब गुंजाळ, मच्छिंद्र बर्डे, संभाजी कोतकर, अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पकाने ही कारवाई केली. आरोपींविरुध्द तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई तोफखाना पोलिसांकडे सोपविण्यात आली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed