• Sat. Sep 21st, 2024
८५ वर्षीय विष्णू पवार जरांगेंच्या साथीला, सोलापूरमध्ये उपोषण, सरकारविरोधात एल्गार करत म्हणाले….

सोलापूर: मोहोळ तालुक्यातील अंकोली गावात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मराठा आरक्षण मिळण्यासाठी अंकोली गावातील भैरवनाथ नरहरी भोसले आणि विष्णू अण्णा पवार हे गेले दोन दिवस झाले आमरण उपोषणाला बसले आहेत. विष्णू अण्णा पवार हे वय ८५ वर्षे आहे. हे एका पायाने अपंग आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी माघार घेणार नाही, हा निर्धार घेऊन आमरण उपोषणास बसले आहेत.
मराठा आरक्षणासाठी शिंदे गटाच्या खासदाराचा राजीनामा, पत्रात म्हणाले, भावना तीव्र आहेत…!
रविवारी सकाळी वृद्ध विष्णू पवार यांची डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली असता त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे. शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले असल्याचा अहवाल दिला आहे. डॉक्टरांनी त्यांना सलाईन घेण्यास डॉक्टरने सांगितले असता त्यांनी औषध उपचार घेणार नाही, अशी ताठर भूमिका घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्याच्या मुख्य ठिकाणी खेड्यातील गावात ग्रामपंचायतीसमोर मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील जवळपास दोनशे गावात राजकीय नेत्यांना, पुढाऱ्यांना, मंत्र्याना गावबंदी करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा दहन करून आरक्षणाची मागणी केली आहे.

तुमची तब्येत व्यवस्थित असणं समाजासाठी महत्वाचं आहे; Sambhajiraje यांचा जरांगेंना फोन

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अंकोली गाव आहे. मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केल्या बरोबर अंकोली गावात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. गावातील विष्णु अण्णा पवार (८५) आणि नरहरी भोसले यांनी गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. वृद्ध विष्णू पवार यांची तब्येत दोन दिवसांत खालावली आहे. डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली असून वृद्ध विष्णू पवार यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed