• Mon. Nov 25th, 2024

    गावबंदीचा वणवा गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यापर्यंत, चिंचोली गावात पुढाऱ्यांना बंदी, ग्रामस्थ आक्रमक

    गावबंदीचा वणवा गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यापर्यंत, चिंचोली गावात पुढाऱ्यांना बंदी,  ग्रामस्थ आक्रमक

    जळगाव: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीवरून संपूर्ण राज्यात मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील जळगाव तालुक्यातील चिंचोली गावातही मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत. चिंचोली ग्रामस्थांनी राजकीय पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घातली आहे.

    मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी या गावामध्ये मंत्री तसेच सर्वपक्षीय राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली असून त्याबाबतचा फलक लावण्यात आला आहे. मराठा समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन मंत्र्यांसह सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत चिंचोली गावात एकही मंत्री तसेच पुढाऱ्याला प्रवेश दिला जाणार नाही. आणि जर कुठल्याही मंत्री अथवा राजकीय पुढाऱ्याने गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या गाड्या फोडल्या जातील असा आक्रमक इशाराही यावेळी मराठा समाज बांधवांनी दिला आहे.

    मराठा आरक्षणाच्या मागणीला बीडमध्ये हिंसक वळण, संतप्त आंदोलकांकडून दोन बसची नासधूस, बससेवा बंद

    मागील पाच दिवसांपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मात्र, प्रकृती खालावल्यानंतरही मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. अनेक गावांनी राजकीय पुढाऱ्यांना गावात येण्यास मज्जाव केला आहे. भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. बीडमध्येही बदामराव पंडित यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही मराठा समाजाकडून घेराव घालत आरक्षणाबाबत प्रश्न विचारण्यात येत आहेत. बारामतीतील मराठा क्रांती मोर्चाने विरोध केल्याने अजित पवारांनी माळेगाव कारखान्याच्या मोळीपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले होते. एकणूच मराठा समाजाच्या आक्रमक पवित्र्यामुळे राजकीय पुढारी हतबल झाले आहेत.

    नांदेडमध्ये भागवत कराड गो बॅकच्या घोषणा; काळे झेंडे दाखवून सकल मराठा समाजाने दर्शवला निषेध

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *