• Sat. Sep 21st, 2024

मराठा आरक्षणाच्या मागणीला बीडमध्ये हिंसक वळण, संतप्त आंदोलकांकडून दोन बसची नासधूस, बससेवा बंद

मराठा आरक्षणाच्या मागणीला बीडमध्ये हिंसक वळण, संतप्त आंदोलकांकडून दोन बसची नासधूस, बससेवा बंद

बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास प्रत्येक गावात साखळी आंदोलन आणि आमरण उपोषण उपोषण सुरू झाला आहे. अनेक जिल्ह्यात आतापर्यंत साखळी आंदोलन आणि उपोषण चालू होतं मात्र आता पूर्णपणे आमरण उपोषण सगळीकडे सुरू करण्यात येत आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक आंदोलकांनी बीड जिल्ह्यात आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमध्ये मध्यरात्री बायपास रोडला टायर जाळून निषेध करण्यात आला. तर बीडच्या धुळे सोलापूर रोडवर एक बस जाळण्यात आली. आज सकाळी पुन्हा एकदा बीड पासून काही अंतरावर असलेला चराटा फाटा या ठिकाणी कल्याण गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आता हिंसक वळण लागले आहे. काल बीड जिल्ह्यात शिंदे समिती दाखल झाली होती. मात्र यावर मराठा आंदोलन हे नाराज ही पाहायला मिळाले. काळे वस्त्र परिधान करून या समितीचा निषेध करण्यात आला होता. मात्र त्यानंतर रात्री बीडच्या दोन वेगवेगळ्या भागात आंदोलन हे हिंसक झाल्याचे पाहायला मिळालं. यात बीडच्या बायपास रोडला टायर जाळून आंदोलने घोषणाबाजी करत सरकार विरोधात घोषणा दिल्या गेल्या तर दुसरीकडे धुळे सोलापूर मार्गावर प्रवासी घेऊन जात असलेली बसची तोडफोड करून आंदोलकांनी जाळली.

आधी मराठा आरक्षण, मगच गावचं पुढारीपण; ३ ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा; जरांगेंना पाठिंबा

यानंतर रात्री बसेस बंद करण्यात आल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा सकाळी बस चालू होताच आंदोलकांनी बीडच्या सराटा फाटा रोडला कल्याण गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक करत या गाडीचं नुकसान केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. आंदोलक हिंसक भूमिका घेत असल्याने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी लाल परी जोपर्यंत पुढील आदेश येत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात आदेश दिले आहेत. सकाळी अचानक आदेश आल्यानंतर अनेक प्रवाशांची हेळसांड झाली. या सकाळीच हा हिंसक प्रकार घडल्यानंतर आता महामंडळ प्रशासनही खडबडून जाग झाले आहे. अनेक गोष्टींच्या खात्री जबाबदारी करत बीडमध्ये बसेस आणून त्या थांबवण्यात येत आहेत. मात्र आता जोपर्यंत सरकार मराठा आरक्षण देत नाही तोपर्यंत हे आंदोलन आता असंच हिंसक होत जाणार असल्याची माहिती मराठा आंदोलकांनी दिली आहे

मराठा आंदोलक आक्रमक, माजी मंत्री बदामराव पंडित यांची गाडी फोडली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed