• Sat. Sep 21st, 2024
पुणेकरांसाठी पर्वणी, ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ डिसेंबरमध्ये; अशा आहेत तारखा

पुणे : भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत परंपरेचा अत्युच्च सोहळा असलेला ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवा’च्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदा १३ ते १७ डिसेंबर असे पाच दिवस पुण्यात रंगणार आहे. महोत्सवाचे यंदा ६९ वे वर्ष आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुलमध्ये महोत्सव होणार असल्याची माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली आहे. शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या या स्वरयज्ञाला पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून रसिक हजेरी लावतात. महोत्सवाच्या तारखा जाहीर झाल्या की अनेक रसिक त्यांचे पुण्यातील मुक्कामाचे नियोजन करतात.

गायन, वादन आणि नृत्याचा सुरेल मिफाल या महोत्सवात अनुभवायला मिळतो. दरवर्षी देशातील विविध संगीत घराण्यांच्या दिग्गज कलाकारांबरोबरच तरुण कलाकार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार, तसेच परदेशी कलाकार यामध्ये आपली कला सादर करून रसिकांचे कान आणि मन तृप्त करतात. तरुण कलाकार या महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळणे म्हणजे भाग्य समजतात. पुण्यातील रसिक दर्दी आणि जाणकार असल्याने, या महोत्सवात कला सादर करणे आमच्यासाठी ऊर्जादायी अनुभव असतो, अशी भावना ते व्यक्त करतात. प्रत्येक वेळी दरवर्षीप्रमाणेच यंदाही महोत्सवात रसिकांना नवीन आकर्षणं अनुभवायला मिळणार आहेत. संस्थेतर्फे कलाकारांची नावे आणि महोत्सवाचे वेळापत्रक सविस्तर लवकरच जाहीर करणार आहेत.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध लागणार विजयाचा षटकार; रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हनबाबत घेतला मोठा निर्णय
किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी यांनी गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ१९५३ पासून ‘सवाई गंधर्व महोत्सव’ आयोजित करायला सुरूवात केली. महोत्सवाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत गेल्याने उपक्रमाची व्याप्तीही वाढत गेली अन् कीर्तीही जगभर पसरली. काही वर्षातच शास्त्रीय संगीताला वाहिलेल्या देशभरातील महत्वपूर्ण संगीत महोत्सवात ‘सवाई गंधर्व महोत्सवा’ने स्थान मिळविले. पं. भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर आर्य संगीत प्रसारक मंडळाने महोत्सवाचे नाव ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ केले आहे. शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायक, वादक आणि नृत्य कलाकारांनी हा स्वरमंच गाजवला आहे. एवढेच नव्हे तर या दिग्गजांच्या पुढच्या पिढ्यांही आता या मंचावर स्वतंत्रपणे त्यांची कला सादर करत आहेत.

पाऊस ठरणार का भारताच्या सहाव्या विजयातील अडथळा? भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याआधी जाणून घ्या लखनौचे हवामान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed