• Mon. Nov 25th, 2024
    कार्याची तयारी सुरू होती; अचानक चिमुरडीचा खांबाला हात लागला, अन् आजी पाठोपाठ नातवावर काळ ओढावला

    भंडारा: घरीच आयोजित कार्यक्रम दरम्यान पाच वर्षीय बलिकेला लागलेल्या विजेच्या धक्क्यातून वाचवण्यासाठी गेलेल्या युवकाला आपले प्राण गमवावे लागले. ही घटना लाखनी तालुक्यातील मचारणा येथे शुक्रवारी संध्याकाळी घडली. जयेश मोरेश्वर घोनमोडे (१७) रा. मचारणा असे मृताचे नाव असून तो आयटीआयचा विद्यार्थी होता.
    मराठा आरक्षणासाठी टोकाचं पाऊल; माजी सरपंचाची पुण्यातील इंद्रायणी नदीत उडी
    मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी जयेशच्या आजीचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यानंतर शुक्रवार सायंकाळी सर्वांच्या भोजणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी घरच्या अंगणताच छोटेखानी चार लोखंडी खांबाचा मंडप घातला होता. सोबतच जेवणाच्याप्रसंगी अंगणात प्रकाश मिळावा म्हणून मांडवाच्या लोखंडी खांबाला विजेचा दिवा बांधण्यात आला होता. अनावधानाने दिव्याचा वायर खराब असल्याने खांबाला वीज प्रवाह मिळाला. यावेळी गावातीलच पिऊ मुकेश बांते (५) हिने या खांबाला हात लावला आणि तिला करंट लागला.

    देवाचा जप करत नाही तेवढा माझा करतात; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं

    हे जयेशच्या लक्षात येताच तो तिला वाचवण्यासाठी पुढे येऊन तिला दूर खेचण्याचा प्रयत्न केला. ज्यात पिऊ तर बचावली. मात्र जयेश लोखंडी खांबाला चिपकूनच राहिला आणि त्याला वाचवण्यासाठी कुणीच काही करू शकले नाही. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. जयेशच्या पश्चात आई आणि एक लहान भाऊ आहे. आजी पाठोपाठ जयेशने प्राण गामावल्याने गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पालांदूर पोलीस स्टेशन येथे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed