• Sat. Sep 21st, 2024

OBC आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरु,रामदास तडसांचा इशारा; जरांगेंबद्दल मोठं वक्तव्य

OBC आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरु,रामदास तडसांचा इशारा; जरांगेंबद्दल मोठं वक्तव्य

नागपूर : मनोज जरांगे पाटील हे ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत. सरकारवर दबाव आणण्यासाठी त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे सरकारवर दबाव वाढवत आहेत त्यांना आरक्षण द्यावे, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. चुकूनही असे घडले तर तेली समाज ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल, असा इशारा वर्ध्यातील भाजप खासदार व प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष रामदास तडस यांनी दिला. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची नागपूर विभागीय बैठक नागपूर पार पडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत खासदार बोलत होते.

जरांगे पाटील यांच्या दबावाखाली सरकारने ओबीसी समाजावर अन्याय करणारा निर्णय घेऊ नये आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये. या बैठकीत या संदर्भातील मोठा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास तेली समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राज्यभर विभागनिहाय बैठका घेत आहे, असे खासदार रामदास तडस म्हणाले.
Latest Points Table: पराभवानंतर ही न्यूझीलंड फायद्यात, थरारक विजयानंतरही ऑस्ट्रेलिया कशी काय मागे राहिली
सरकारने जातनिहाय जनगणना करावी, केंद्र सरकारने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के करावी, आरक्षणात वाढ करावी, ओबीसी समाजाला आणि तेली समाजाला विधानसभेत जागा द्याव्यात आणि लोकसभेत राजकीय प्रतिनिधित्व द्यावे,असे पाच महत्त्वाचे ठराव आज महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेत संमत करण्यात आले.
मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक, मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा;जरांगेंची सरकारशी चर्चेची तयारी, म्हणाले..
जरांगे पटलाच्या मागणीला आमचा विरोध आहे. ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असलेल्या सर्व जाती याला विरोध करत आहेत. तेली समाजाची ओबीसीमध्ये संख्या मोठी आहे. त्यामुळे जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी आमची मागणी आहे. राज्य सरकार ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पण जरांगे पाटील यांचा सरकारवर जास्त दबाव वाढणार नाही याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राज्यभर विभागनिहाय बैठका घेत आहे. जातनिहाय जनगणनेनंतर आपली टक्केवारी ६८ ते ६९ टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. हा आमचा हक्काचा लढा असल्याचेही ते म्हणाले.महाराष्ट्रात तेलघाणा महामंडळ स्थापन करण्याच्या आमच्या मागणी आम्ही रेटून धरू, असेही खासदार तडस यावेळी म्हणाले.
Eknath Shinde : एकनाथ शिंदे कणेरी मठात दाखल, मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याबाबत कमालाची गुप्तता, कारण…

जरांगेंना विरोध, भुजबळांचं समर्थन, अंबडमध्ये ओबीसी समाज रस्त्यावर

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed