अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा सामाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची भूमिका घेतल्याने भुजबळांना मोठा धक्का बसला आहे. मागच्या चार दिवसांपूर्वीच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी भुजबळांची साथ सोडली आहे. जयदत्त होळकर यांना भुजबळांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. जयदत्त होळकर हे राष्ट्रवादीचे प्रांतिक सरचिटणीस आहेत. त्यांनी या पदाचाही राजीनामा दिला आहे.
मराठा आरक्षणाला मंत्री भुजबळ विरोध करत असल्याने मी राजीनामा देत असल्याची भूमिका होळकर यांनी मांडली होती. निफाड तालुका पूर्व ४६ गाव तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा भुजबळ यांना धक्का बसला असून माजी आमदार संजय पवार यांनी भुजबळांची साथ सोडली आहे.
छगन भुजबळ यांची मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात असलेल्या भूमिकेमुळे अनेक मराठा समाजातील भुजबळ समर्थक भुजबळ यांच्या विरोधात उघड भूमिका घ्यायला लागले आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील भुजबळ यांना या गोष्टीला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भुजबळांच्या या भूमिकेमुळे राजीनामा सत्र सुरू झाले असून दोन बड्या नेत्यांनी भुजबळ यांची साथ सोडली आहे.
भुजबळ यांचे समर्थक जयदत्त होळकर यांनी राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून माजी आमदार आणि मनमाड बाजार समितीचे सभापती संजय पवार यांनी देखील सभापती पदाचा राजीनामा देत भुजबळ यांना एक प्रकारे धक्काच दिला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News