• Mon. Nov 25th, 2024

    ‘पुणे-मुंबई एक्सप्रेस वे’ वर पुन्हा विशेष ब्लॉक, कोणत्या मार्गावरील वाहतूक बंद राहणार? जाणून घ्या

    ‘पुणे-मुंबई एक्सप्रेस वे’ वर पुन्हा विशेष ब्लॉक, कोणत्या मार्गावरील वाहतूक बंद राहणार? जाणून घ्या

    लोणावळा, पुणे : मुंबई – द्रुतगती महामार्गावर मुंबईच्या.दिशेने बोरघाट हद्दीत किमी ४४/८०० आणि किमी ३७/८०० या ठिकाणी ग्रांटी बसविण्यासाठी उद्या (दि.२६) रोजी १२ ते १ असा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबईकडील सर्व वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच अवजड वाहतूक उर्से टोलनाक्यावर थांबवण्यात येणार आहे.

    फक्त कार साठी किमी ५५ लोणावळा एक्झीट येथून जुना पुणे मुंबई महामार्ग – अंडा पॉईंट – द्रुतगती महामार्ग – खोपोली exit – इंदिरा चौक खोपोली मार्गे वाहतूक सुरू राहणार आहे.

    राजकीय नेत्यांनी पोस्ट टाकली की ‘भावपूर्ण श्रद्धांजली’च्या कमेंट, मराठा समाज आक्रमक, आरपार लढाईचा एल्गार

    काम पुर्ण झाल्यावर दुपारी १ वाजता सदर वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावरून दिवसभरात लाखो वाहने ये – जा करत असतात. उद्या एक तासाचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून प्रवाशी नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी या वेळेत प्रवास करणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे या वेळेत महामार्गावरून प्रवास करणं टाळावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

    गेल्या काही दिवसांपासून द्रुतगती महामार्गावर विशेष ब्लॉक घेतला जात आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ग्रँटी उभारण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्या दृष्टिकोनातून हे ब्लॉक घेतले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. उद्याचा ब्लॉक हा मुंबईच्या दिशेची वाहतूक बंद करण्यात येणार असून यावेळेत प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला भगदाड, दिग्गज नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *