• Sat. Sep 21st, 2024

शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार; रविकांत तुपकरांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार; रविकांत तुपकरांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

नागपूर: कापूस, सोयाबीन, धानाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफ्यासह भाव, अतिवृष्टीग्रस्त तसेच, कमी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सरसकट दहा रुपये मदत आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी निर्णायक लढा उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.
मोदींच्या सभेची विखेंनी तयारी केली, लाखभर गर्दी जमविण्याचं प्लॅनिंग, पण मराठा वादळ धडकण्याची धास्ती!
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. यानिमित्त सर्वत्र वातावरण निर्मितीसाठी तुपकर विदर्भाच्या दौऱ्यावर निघाले आहेत. नागपुरात बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर हल्ला चढवत एल्गार पुकारला. ब्रिटिश सरकारविरोधात शहीद भगतसिंग यांनी दिलेला स्वातंत्र्य लढा डोळ्यासमोर ठेवून सरकारला जागे करण्यासाठी आमचे आंदोलन राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे. सरकारने मागण्यांची तत्काळ दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला.

शिवरायांसमोर शपथ घेतली पण ४० दिवसांत मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही?; राऊतांचा सवाल

आयात-निर्यात धोरण शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. कापसाला उत्पादन खर्च ८ हजार रुपये आणि बाजारभाव ७ हजार रुपये आहेत. प्रत्यक्षात कामाला साडे बारा हजार रुपये क्विंटल भाव देण्यात यावे. सोयाबीनची स्थितीही अशीच आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी आहेत. संतनगरी शेगाव येथून येत्या १ नोव्हेंबर रोजी एल्गार रथयात्रा काढण्यात येणार आहे. २० तारखेला बुलडाणा येथे मोर्चा काढण्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी येथे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed