मुंबई : सहा दशकांची अभेद्य परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा… शिवसेना फुटल्यानंतर गेल्या वर्षीपासून दोन दसरा मेळावे साजरे व्हायला सुरूवात झाली. एकीकडे उद्धव ठाकरे दर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचं संबोधन… परंपरेप्रमाणे ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांचा मेळावा गेल्या वर्षी बीकेसी तर यंदा आझाद मैदानावर… दोन्ही मेळाव्यातील भाषणांची जशी चर्चा होतीये तशीच मेळाव्यातील गर्दीचीही चर्चा सुरु आहे. ठाकरे की शिंदे, कुणाकडे गर्दी जास्त होती? कुणाची सभा पॉवरफुल्ल झाली? ठाकरेंच्या मेळाव्यात मागच्या वर्षी लोक आले, पण यावर्षी गर्दी ओसरली का? अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत..
शिवसेनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत दसरा मेळाव्याचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा कधीच चुकलेला नाही. पण गेल्या वर्षी ज्याप्रमाणे ठाकरेंकडे दसरा मेळाव्याला लोकांची गर्दी जमली होती, त्याप्रमाणे मेळ्याव्यासाठी यावर्षी गर्दी जमली नाही अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्याची कारणं पाहिली तर…..
शिवसेनेच्या आजपर्यंतच्या वाटचालीत दसरा मेळाव्याचे स्थान हे अनन्यसाधारण आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा कधीच चुकलेला नाही. पण गेल्या वर्षी ज्याप्रमाणे ठाकरेंकडे दसरा मेळाव्याला लोकांची गर्दी जमली होती, त्याप्रमाणे मेळ्याव्यासाठी यावर्षी गर्दी जमली नाही अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्याची कारणं पाहिली तर…..
शिवाजी पार्कमधील मेळाव्याला गर्दी कमी?
- गेल्या वर्षी जूनमध्ये शिवसेनेत बंड झालं.
- बंडानंतर शिवसेनेतील नेते हळूहळू ठाकरेंना सोडून शिंदे गटात जाऊ लागले.
- हे सगळंच पाहता ठाकरेंना सहानुभूती मिळाली, त्यामुळे हजारो जणांची गेल्यावर्षी दसरा मेळाव्याला उपस्थिती होती
- बंडानंतर ठाकरेंच्या महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या दौऱ्याने मेळाव्याला गर्दी वाढल्याचा अंदाज
- यावर्षीच्या सभेसाठी ठाकरेंनी उरलेल्या आमदारांनाही लोकं आणण्यासाठी विशिष्ट टार्गेट दिलं नव्हतं
- मेळाव्यासाठी राज्यातून आलेले लोक हे स्व:खर्चाने भाकरी बांधून आले होते
तर दुसरीकडे शिंदेंच्या मेळाव्यात आमदारांनी ग्रामीण भागातील जमवलेली गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली.
आझाद मैदानातील मेळाव्याला गर्दी कमी?
- शिंदे गटाचा मागील मेळावा हा बीकेसीला पार पडला होता.
- गावोगावचा शिवसैनिक यावा, ताकद दाखवायची, या इर्षेने शिंदे गटाने तगडं प्लॅनिंग केलं होतं.
- पक्षफुटीनंतर पहिलाच मेळावा झाल्याने मोठं शक्तीप्रदर्शन केले होते.
- मनोरंजन क्षेत्रातली दिग्गज मंडळी, जयदेव ठाकरे यांचं कुटुंब, अयोध्येतील संत महंत यांची उपस्थिती होती.
- यावर्षी आझाद मैदानात धनुष्यबाण असलेले मोठे कटआऊट्स लावले होते
- गर्दी जमावण्यासाठी वृत्तपत्रात जाहिराती देण्यात आल्या होत्या.
- ठाण्यातील शेवटच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी वापरलेली खुर्ची व्यासपीठाच्या मध्यभागी ठेवली होती.
- ज्यावर भगवी शाल टाकण्यात आली होती, ज्या खुर्चीची शिंदेंच्या हस्ते पूजा करण्यात आली.
- शिवसेना गीते गाण्यासाठी मोठ्या गायकांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
- ग्रामीण भागातील आमदारांनी मतदारसंघात खाजगी बस, एसटी बसही बुक केल्या होत्या.
भगवं उपरणं, हाती मशाल घेऊन शिवसैनिक शिवतीर्थावर दिसत असताना तिकडे आझाद मैदानावर झेंड्यांचीच संख्या मोठी असल्याचं चित्र असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली.
राजकीय जाणकार काय सांगतात?
- राज्यात जरांगे पाटलांनी उपस्थित केलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे.
- मराठा आंदोलक आक्रमक झाले असून आरक्षण देत नाहीत तोपर्यंत नेत्यांना गावात
- फिरकू देणार नाही अशा भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
- त्याचाच परिणाम अंशत: नेत्यांच्या कार्यक्रमांवर झालेला पाहायला मिळत असल्याची शक्यता
- शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्षातही बंड झालेलं पाहायला मिळालं.
- त्यामुळे बंड झाल्यानंतरची धग ही आधीपेक्षा कमी जाणवल्याचं चित्र दिसलं
आता मैदान कोणतंही असलं तरी लोकांसाठी विचार महत्त्वपूर्ण आहेत, हेही तितकंच खरं आहे.