• Mon. Nov 25th, 2024

    तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबियांची सगळीकडे शोधाशोध, प्राचीन विहिरीजवळ जाताच सगळे हादरले, काय घडलं?

    तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबियांची सगळीकडे शोधाशोध, प्राचीन विहिरीजवळ जाताच सगळे हादरले, काय घडलं?

    चंद्रपूर: चंद्रपूर शहरात अनेक प्राचीन वास्तू आहेत. या वास्तू बघायला दूरवरून पर्यटक येतात.मात्र, अशाच एका प्राचीन विहरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील सोनामाता मंदिराजवळ असलेल्या जुन्या काळातील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला.त्यामुळं शहरांत एकच खळबळ उडाली.तोल गेल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.आकाश पाल (२६) असे मृतक तरुणाचे नाव आहे. मृत तरुण माता चौक येथील रहिवासी आहे.

    प्राप्त माहिती नुसार,शहरातील माता चौक येथे राहणारा आकाश पाल हा दोन दिवसापासून बेपत्ता होता. कुटुंबियांनी शोधाशोध केली. मात्र तो सापडला नाही. त्यामुळं कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती.अशात आज कुटुंबियांना एका व्यक्तीने सांगितलं, एक तरुण सोमनाथ मंदिराजवळ असलेल्या प्राचीन विहिरीजवळ त्यांना दिसला होता.कुटुंबियांना शंका आली. कुटुंबियांनी विहिरीकडे धाव घेतली. तेव्हा त्यांना मृतदेह तरंगताना दिसला.पोलीस तथा महानगर पालिका आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. कुटुंबातील कमावता तरुण गेल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान पुढील तपास पोलीस करीत आहेत.

    पत्नीच्या चारित्र्यावर संशय; सततची भांडणं, पतीचा टोकाचा निर्णय, अन् कुटुंब उद्धवस्त, काय घडलं?

    विहिरीला जाळी नाही

    ही विहीर रस्त्याचा कळेला आहे.वार्डातील नागरिक या मार्गाने ये जा करतात. विहीर जुनी असल्याने ही विहीर बघण्याचा मोह अनेकांना होतो. मात्र या विहीरला सुरक्षा जाळी नाही. त्यामुळे अश्या घटना यापूर्वी ही घडल्याची माहिती. घटना लक्षात येताच आम आदमी पार्टीचे नेते राजू कुडे यांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह काढण्यास मदत केली. विहिरीवर सुरक्षा जाळी बसाविण्याची कुडे यांनी मागणी केली आहे.

    एका आठवड्यात २ मराठा तरुणांच्या आत्महत्या; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली अस्वस्थता

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed