• Mon. Nov 25th, 2024

    Pune News:पिझ्झा डिलिव्हरीला उशीर, संतापलेल्या ग्राहकाची डिलिव्हरी बॉयला मारहाण; हवेत गोळ्या झाडल्या, आरोपी अटकेत

    Pune News:पिझ्झा डिलिव्हरीला उशीर, संतापलेल्या ग्राहकाची डिलिव्हरी बॉयला मारहाण; हवेत गोळ्या झाडल्या, आरोपी अटकेत

    संदीप भातकर ,येरवडा: पिझ्झा ची ऑर्डर उशीरा आल्याने ग्राहकाने डोमिनोज पिझ्झाच्या डिलिव्हरी बॉयला शिवीगाळ करून मारहाण केली. सहकाऱ्याला मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना ग्राहकाने शिवीगाळ करून फॉरच्युनर गाडीतील पिस्तूल आणून हवेत गोळीबार केला. वाघोलीतील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.लोणीकंद पोलीसांनी गोळीबार करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.

    चेतन वसंत पडवळ (रा.ओझोन विलास सोसायटी, वाघोली मंदिर शेजारी ,वाघोली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रोहित राजकुमार हुलसुरे (वय.२२, रा.खराडी) याने फिर्याद दिली आहे.

    जेजुरीच्या खंडोबा मंदिरात रंगली खंडा स्पर्धा, ४० किलोचा खंडा उचलून तरुणांच्या ताकदी कसरती
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी पडवळ याने सोमवारी रात्री अकरा वाजता डोमिनोज पिझ्झाच्या दुकानातून पिझ्झाची ऑर्डर दिली होती.सोमवारी ग्राहकांची मागणी जास्त होती.डिलिव्हरी बॉय ऋषिकेश अन्नपुर्वे हा पडवळ याची ऑर्डर घेऊन घरी गेला. पिझ्झाची ऑर्डर उशीरा का आणले म्हणून डिलिव्हरी बॉय ला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

    त्यानतंर डिलिव्हरी बॉयने दुकानात काम करणाऱ्या सहकाऱ्यांना ग्राहकाने मारहाण केल्याची माहिती दिली.त्यामुळे दुकानातील देवेंद्र आणि राहुल हे दोघे आरोपी पडवळ याच्या घरी आले आणि सहकाऱ्याला का मारहाण केली याचा जाब विचारला.त्यामुळे पडवळ याने दोघांना शिवीगाळ करून त्यांनाही मारहाण केली.

    १६ चपात्या, कढी भात अन् १७ तास; बँक मॅनेजर पतीला संपवलं; बॉडी गायब करण्याचा प्लान, पण…
    त्यानंतर घराबाहेर उभारलेल्या फॉरच्युनर गाडीतील पिस्तूल काढून पिझ्झाच्या कर्मचाऱ्यांना पाहून हवेत गोळीबार केला.यामुळे कर्मचारी घाबरून तिथून पळून गेले.लोणीकंद पोलिसांना घटनेची माहिती दिल्यावर पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानतंर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले.

    सारसबागेतील श्री महालक्ष्मी देवीला नेसली सोन्याची साडी; अद्भुत रुप डोळ्यात साठवण्यासाठी लाखो भक्तांची गर्दी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed