या मैदानी दसऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला पानसे सरदारांनी दिलेली ४० किलो वजनाचे खंडा म्हणजेच तलवार आणि याच तलवारीला घेऊन जेजुरी गडावर वेगवेगळ्या कसरती केल्या जातात.
एका हाताने ही तलवार तोलून धरली जाते. त्याचबरोबर दातात धरून ही तलवार तोलून दिली जाते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कसरतीही केल्या जातात. एकूणच ४० किलो वजनाची तलवार असल्यामुळे ही तलवार उचलनं देखील अवघड असतं आणि अशा परिस्थितीमध्ये या तलवारीला घेऊन कसरती केल्या जातात. त्यामुळे या स्पर्धेकडे महाराष्ट्रातील लोकांचे लक्ष लागलेलं असतं.
अनेक भाविक ही स्पर्धा पाहण्यासाठी येत असतात. जेजुरी आणि परिसरातील तरुण या स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हीच खंडा स्पर्धा मंदिराच्या समोरील प्रांगणात घेतली जाते. आज या स्पर्धेला मोठ्या संख्येने स्पर्धक आणि भाविक हे आलेले आहेत. मार्तंड देव संस्थांच्यावतीने या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसही दिलं जातं.
खंडा कसरत स्पर्धेत देवसंस्थानचे कर्मचारी व ग्रामस्थ नितीन कुदळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सलग जास्त वेळ खंडा उचलणे या मुख्य स्पर्धेत अंकुश गोडसे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी देवस्थानतर्फे सर्व उपस्थित ग्रामस्थ, मानकरी, सेवेकरी, पुजारी यांचा सन्मान करण्यात आला; तसेच स्पर्धेतील विजेत्यांना मानाच्या ट्रॉफी व रोख पारितोषिक देण्यात आले.
सोमवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला दसऱ्याचा सोहळा दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी बारा वाजता संपला. येथील ऐतिहासिक दसरा सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक उपस्थित होते.
Read Latest Maharashtra News And Marathi News