जालना येथील विकास राजू वाघ हा युवक शेतकरी आपल्या घरच्यांसोबत झेंडू ची फुले विकण्यासाठी तीन दिवसांपूर्वी जालना येथून आला होता. सुरुवातीला तो पुण्यातील मार्केट मार्ड येथे फुले विक्रीसाठी आला होता. मात्र, येथे त्या फुलांची विक्री झाली नाही. त्यानंतर तो वाशी मार्केट ला घेऊन गेला, तिथे देखील सेम परिस्थिती पाहायला मिळाली. शेवटी त्या शेतकऱ्यांनी फुलासह जालन्याला जाण्यासाठी प्रवास सुरू केला. पुणे जिल्ह्यातील शिरूर जवळ आल्यानंतर त्याने गाडीतील जवळपास वीस पेक्षा अधिक फुलांचे क्रेट रस्त्त्यावर फेकून दिले.
तीन दिवसापासून आम्ही आमचं घर सोडून फुले विक्री करण्यासाठी आलो होतो. पुण्यातील आणि मुंबईतील मार्केट फिरलो पण आमच्या फुलला एकही रुपया मिळाला नाही. आम्ही दोन दिवसांपासून काही खाल्लेले देखील नाही. तीन दिवसांपासून झोपलो नाही, पोटाला खाल्लं देखील नाही. बाहेरून आयात करणार आणि आमच्या शेतकऱ्यांची त्यांनी माती करून टाकली, अशा संतप्त भावना या युवा शेतकरयांने व्यक्त केली आहे.
मात्र, दसरा सणाच्या मुहूर्तावर आपल्या कुटुंबासोबत दसरा सण साजरा करावा, अशी अपेक्षा मनात असताना देखील पन्नास क्रेट पैकी एकही फुल विकले गेले नाही. आता कुटुंबाला काय उत्तर द्यायचे अशा भावना जड अंतःकरणाने शेतकऱ्याने व्यक्त केल्या आहेत.
जालन्याच्या या युवा शेतकऱ्याच्या उदाहरणावरुन शेतकऱ्यांच्या शेतमालाची विदारक स्थिती सर्वांपुढं आलेली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News