• Sat. Sep 21st, 2024
लेकरं बिलगली, बाप भावूक; रोहित पवार युवा संघर्ष यात्रेला, घरातून निघताना गहिवरले

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवा यांच्या युवा संघर्ष यात्रेला सुरुवात आजपासून सुरुवात झाली आहे. पुण्यात शरद पवार यांच्या सभेनंतर संघर्ष यात्रा सुरु होत आहे. युवकांच्या प्रश्नांवर सीमोल्लंघनासाठी निघालो असल्याच्या भावना रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केल्या.

बरेच दिवस भेट होणार नसल्याने आनंदिता आणि शिवांश यांना बिलगून गहिवरलो, अशा भावना रोहित पवारांनी व्यक्त केल्या. घरातून निघताना रोहित पवार भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

पवारांच्या मुशीत तयार झालेला नेता भाजपकडून लढण्यास इच्छुक, मतदारसंघही निवडला राजकीय गुरुचा
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आई-बाबा आणि सासू-सासरे यांचा आशीर्वाद घेऊन राज्यातील तमाम युवांच्या प्रश्नांवर सीमोल्लंघनासाठी निघाल्याचं रोहित पवार म्हणाले.

काँग्रेस सोडताना आरोप केले त्या ‘दिराशीच’ गूळपीठ, भाजपचे हर्षवर्धन पाटील पवार कुटुंबाच्या मंचावर
यावेळी आपल्या संस्कृती-परंपरेप्रमाणे आई, ताई, पत्नी या सर्वांनी औक्षण केलं आणि पत्नी कुंतीने दही-साखरेचा चमचा हाती देऊन शुभेच्छा दिल्या. बरेच दिवस भेट होणार नसल्याने आनंदिता आणि शिवांश बिलगूनच होते, असं रोहित सांगत होते.

रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा, शरद पवारांचं मिस्ड कॉल देत समर्थन

त्यांच्यामुळे काही क्षण गहिवरल्यासारखं वाटलं पण आम्हीच दिवाळीला भेटायला येतो, असं ते म्हणाले आणि सर्व कुटुंबिय पाठीशी खंबीर उभे राहिल्याने ठाम निर्धाराने युवांच्या हक्कासाठी संघर्ष करण्याच्या मोहिमेवर बाहेर पडलो. असेच असंख्य पदयात्रीही निघाले असून आपल्या या युवा संघर्ष यात्रेत तुम्हीही सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असं आवाहन रोहित पवारांनी केलं.

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed